शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

संगीत शंकर दरबारला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:34 IST

शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुजया व श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

नांदेड : शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुजया व श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सोमवारी पूर्वसंध्या कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अभिनेत्री स्पृहा जोशी या करणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ ते १ या वेळेत कुसुम सभागृहात भार्गवी देशमुख हिचे कथ्यक नृत्य, स्वराली जोशी आणि साईप्रसाद पांचाळचे शास्त्रीय गायन होणार आहे.द्वितीय सत्रात यशवंत महाविद्यायाच्या प्रांगणात संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल महामहोपाध्याय डॉ. कमलाकर परळीकर यांना आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. शेषराव मोरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण, उद्घाटक म्हणून पंडित मुकुल शिवपुत्र यांची तर प्रमुख उपस्थिती डॉ. गिरीष गांधी यांची राहणार आहे. यावेळी एस. आकाश (बासरी) यज्ञेश रायकर (व्हायोलीन) व इशान घोश (तबला) यांची त्रिभुक्ती हा जुगलबंदीचा कार्यक्रम संगीत शंकर दरबारमध्ये होणार आहे.

टॅग्स :Nandedनांदेडcultureसांस्कृतिकmusicसंगीत