शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

By श्रीनिवास भोसले | Updated: August 24, 2022 15:21 IST

आरोपीने भावाजवळ दिला होता खुनाचा कबुलीजबाब

नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी आज जन्मठेप व १० हजार रुपये दंड ठोठावला.  मोतीराम तोडसाम असे आरोपीचे नाव आहे.

जशोदा तांडा (थारा)ता. किनवट येथील मोतीराम तोडसाम हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस नेहमी मारहाण करत असे. शेजारीच भाऊ शेषराव राहत असल्याने त्याने अनेकदा मोतीराम यास दारू पिऊ नये असा वारंवार समजून सांगत असे. परंतू मोतीराम दारुच्या आहारी गेल्याने तो कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, १० ऑक्टोबर २०१३ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास कुत्रे भूंकत असल्याने उठून बाहेर आला. त्यावेळी त्याचा भाऊ शेषराव समोर उभा होता. त्यास त्याने पत्नी लक्ष्मीबाई हिस मारल्याचा कबूली जवाब दिला. त्यानंतर आरोपीचा भाऊ शेषराव यांनी ब-याचवेळ शोधाशोध केल्यानंतर सकाळच्या दरम्यान शेतातील बेसमेंटजवळ एक मृतदेह  निदर्शनास आला. 

शेषराव यांनी या प्रकरणात मोतीरामनेच पत्नी लक्ष्मीबाईचा रात्री झोपीत गळा दाबून खून केला व जवळच्या चालू असलेल्या बांधकामाजवळ प्रेत फेकून दिले, फिर्याद किनवट पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणाचा अधिक तपास करून पोलीस निरीक्षक जगताप यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणातील ९ साक्षीदारांची न्यायालयाने तपासणी केली. यानंतर या प्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी आरोपी मोतीराम यास जन्मठेप आणि १० हजारांचा दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. आशिष गोदंमगावकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयNandedनांदेड