शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या एनसीबीची नांदेडमध्ये कारवाई; ३५ गोण्यांतील तब्बल ४ कोटींचा गांजा जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 14:33 IST

Mumbai NCB's action in Nanded: , नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई येथील एनसीबी पथकास खबऱ्याने दिली

नांदेड : मुंबई येथील एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे एका ट्रकमधून ( MH26 AD 2165 ) ३५ गोण्यांतील तब्बल ४ कोटींचा गांजा जप्त केला (Mumbai NCB's action in Nanded) . विशाखापट्टणम येथून राज्यात विक्रीसाठी हा गांजा आणण्यात आला होता. याप्रकरणी एनसीबीच्या पथकाची पुढील  कारवाई सुरु आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई येथील एनसीबी पथकास खबऱ्याने दिली.यामाहितीवरून एनसीबी पथकाने आज पहाटे मांजरम येथे सापळा लावला. ग्रामस्थ, स्थानिक पोलीस आदींच्या मदतीने पथकाने एक ट्रक ( MH26 AD 2165 ) अडवला. ट्रकची तपासणी केली असता ३५ गोण्यांमध्ये तब्बल ४ कोटींचा गांजा आढळून आला. ही कारवाई एनसीबी अधिकारी अमोल मोरे, सुदाकर शिंदे, संजय गवली, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांनी केली. तर पथकास गजानन पाटील चव्हाण, सरपंच श्रीकांत नीळकंठ मांजरमकर, पोलीस पाटील जयराज पाटील शिंदे, वसंत शिंदे, इंद्रजीत पटवे, बापूराव पटवे यांच्यासह मांजरम ग्रामस्थांनी मदत केली. 

जळगाव येथे एनसीबी पथकाने १५०० किलो गांजा पकडला मुंबई एनसीबी पथकाने आज पहाटे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे १५०० किलो गांजा जप्त केला आहे.  एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल १५०० किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. विशेष म्हणजे, राज्यात विक्रीसाठी नांदेड येथील गांजा सुद्धा विखाशापट्टणम येथूनच आणण्यात आला होता.  

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी