शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुदखेड बाजार समितीची रणधुमाळी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:49 IST

मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया १२ जुलैपासून सुरु होत आहे. शेतकरी गटासाठी १५, व्यापारी मतदारसंघात २ आणि हमालमापाडी मतदारसंघात १ अशा १८ सदस्यांना निवडून द्यायचे आहे. ११ आॅगस्ट रोजी मतदान होईल. या निवडणुकीत ८ हजार ७१३ मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ, ११ आॅगस्ट रोजी मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया १२ जुलैपासून सुरु होत आहे. शेतकरी गटासाठी १५, व्यापारी मतदारसंघात २ आणि हमालमापाडी मतदारसंघात १ अशा १८ सदस्यांना निवडून द्यायचे आहे. ११ आॅगस्ट रोजी मतदान होईल. या निवडणुकीत ८ हजार ७१३ मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १५ गणांचा समावेश आहे. तसेच व्यापारी मतदारसंघाचे २ आणि हमालमापाडी मतदारसंघाचा एक प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. व्यापारी मतदारसंघासाठी १५३ तर हमालमापाडी मतदारसंघासाठी ३३ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी मुदखेडचे तहसीलदार सुरेश घोळवे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक एस.एन. गाढवे आणि नायब तहसीलदार एस.एस. भोसीकर हे काम पाहतील. निवडणूक निरीक्षक म्हणून भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण चांडक यांची नेमणूक करण्यात आली आहे.मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जवळपास १८ मतदान केंद्र राहणार आहेत. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत बाजार समितीच्या बाजार क्षेत्रामध्ये कोणत्याही कामाचे उद्घाटन करता येणार नाही. विश्रामगृह वापरासही निर्बंध आहेत. बाजार समिती निवडणुकीच्या कालावधीत बाजार समितीचे सर्व वाहने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतील, असेही स्पष्ट करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकरारी (सामान्य) अनुराधा ढालकरी यांची उपस्थिती होती.---नव्या आदेशाने मतदारसंख्येत झाली लक्षणीय वाढकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पूर्वी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि ग्रामपंचायतीचे पंच हेच मतदान करत असत. मात्र नव्या नियमानुसार आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व गणांमधील गावातील रहिवासी असलेले शेतकरी. ज्यांच्याकडे १० आर. पेक्षा जास्त जमीन आहे व जे १८ वर्षे पूर्ण करतात, अशा सर्व शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार शेतकºयांची प्रारुप मतदारयादी ६ जून २०१८ रोजी प्रसिद्ध केली. १५ जूनपर्यंत आक्षेप नोंदविले. २९ जून रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.---निवडणूक कार्यक्रम असा१२ ते १८ जुलै या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.छाननी १९ जुलै रोजी होईल.२० जुलै ते ३ आॅगस्ट हा नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा कालावधी, निवडणूक चिन्हाचे वाटप ४ आॅगस्ट रोजी.११ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजपर्यंत मतदान.१२ आॅगस्ट रोजी मतमोजणी

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड