शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद

By शिवराज बिचेवार | Updated: October 3, 2023 15:42 IST

संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले. 

नांदेड - नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. त्यातच मंगळवारी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी करुन चक्क अधीष्ठातांना बालरोग कक्षातील शौचालय साफ करायला लावले. या प्रकरणाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी करा, स्टंटबाजीला आमचा विरोध आहे, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

खासदार हेमंत पाटील यांनी दुपारी अधीष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्या कक्षात बैठक घेतल्यानंतर त्यांना घेवून ते रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी निघाले. यावेळी जागोजागी घाण, लिफ्ट बंद असे आढळून आले. त्यानंतर खासदार हे अधीष्ठाता यांना घेवून बालरोग कक्षात दाखल झाले. या ठिकाणी एका बेडवर दोन चिमुकल्यांवर उपचार सुरु असल्याचे दिसून आले. तसेच या कक्षातील चार शौचालय हे कुलूप बंद होते. तर उघड्या शौचालयात प्रचंड घाण होती.  त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले. 

या प्रकरणाची माहिती युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर दुपारी ३ वाजता ते विद्यार्थी अधीष्ठाता कार्यालयासमोर जमले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण वेगळे आहे. परंतू केवळ राजकीय फायद्यासाठी खासदारांनी आमच्या प्रमुखांना शौचालय साफ करायला लावले, ही बाब निषेधार्ह असून याबाबत उद्या काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटल