शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:31 IST

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. लोहा तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे.

ठळक मुद्देलोहा, अर्धापूर, हदगाव तालुक्यात अंमलबजावणीअल्प, अत्यल्प शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोहा : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. लोहा तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे. त्याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना प्रती शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्यात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.शेतक-यांसाठी असलेली कल्याणकारी योजनेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी तहसीलदार परळीकर यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांची एक विशेष बैठक घेऊन त्यांना सदरील योजनेची माहिती दिली व त्याची गाव पातळीवर माहिती देऊन तात्काळ अंमलबजावणी करुन शेतक-यांना लाभ पोहचविण्याच्या सूचनाही तहसीलदारांनी दिल्या.योजनेअंतर्गत प्रत्येक गावनिहाय खातेदार शेतक-यांची संगणीकृत यादी करण्यात येणार आहे. तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटूंबाचाही सदरील योजनेत समावेश करण्यात येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या कुटुंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी योग्य एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना सदर योजना अनुज्ञेय आहे.खातेदारांचे कुटूंबनिहाय वर्गीकरण केल्यानंतर ज्या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी योग्य एकूण धारण क्षेत्र दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबाची यादी तयार करण्यात येणार असून १ फेब्रूवारी २०१९ रोजी असलेले धारण क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे.सदर यादीत पात्र खातेदारांचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, आयएफसी कोडसह बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे सदर योजनेत संवैधानिक पद धारण करणारे तसेच आजी, माजी राज्यसभा सदस्य, माजी खासदार, आजी राज्यमंत्री, माजीमंत्री विधानसभा, आजी माजी महानगर पालिकेचे महापौर, विधान परीषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी, स्वायत्त संस्थाचे अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेले व्यक्ती, दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, चार्टर्ड आकाऊटंट सनदी लेखापाल, आर्किटेक्ट इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती लाभ मिळण्यासाठी पात्र असणार नाहीत.या शेतक-यांना मिळणार नाही लाभया योजनेचा लाभ आजी-माजी आमदार, मंत्री, माजी महापौर, आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेचे कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून, स्वराज्य संस्थेतील नियमित अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेले व्यक्ती, दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक निवृत्तीवेतन धारक व्यक्ती अशांना योजनेचा लाभ मिळणार नाही -महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी, हदगाव़प्रशासनाची बैठकअर्धापूर : तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासंदर्भात प्रशासन सरसावले आहे़ या अनुषंगाने तहसीलदार सुजीत नरहरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांची बैठक आयोजित करण्यात आली़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी