शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच, भाववाढीची प्रतीक्षा

By राजेश निस्ताने | Updated: January 23, 2025 06:51 IST

Nanded News: बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे.

- राजेश निस्ताने   नांदेड - बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे. भाव वाढल्यास मात्र शासकीय कापूस खरेदीतून सीसीआय ‘आऊट’ होणार आहे.

या वर्षी ‘सीसीआय’कडून राज्यात १२७ केंद्रे सुरू करण्यात आली. अलीकडे १ कोटी २५ लाख क्विंटल कापसाची (२० लाख २० हजार गाठी) खरेदी ‘सीसीआय’ने केली आहे. त्यात मराठवाडा व खान्देशात ८ लाख ८० हजार गाठी, तर विदर्भात १२ लाख २५ हजार गाठी बनतील, एवढा कापूस आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे.  

२९९ लाख गाठी उत्पादन? देशात १ कोटी १६ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली. त्यातून २९९ लाख गाठी बनतील, एवढ्या कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीसीआय’ने वर्तविला आहे.आतापर्यंत देशात ७५ लाख गाठींचा कापूस खरेदी करण्यात आला. त्यात महाराष्ट्राचा वाटा २० लाख गाठींचा आहे. सध्या बाजारात कापूस गाठींना ५३ ते ५४ हजार एवढा भाव आहेआतापर्यंत राज्यात ४३ लाख गाठींच्या कापसाची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा ३६ लाख गाठी एवढा होता.  

पथकाच्या आकस्मिक भेटी‘सीसीआय’च्या मुंबईतील पथकाकडून खरेदी केंद्रांवर आकस्मिक भेटी दिल्या जात आहेत. सोमवारी बीड, मंगळवारी परभणी व हिंगोलीत भेटी दिल्या गेल्या. बुधवारी अकोल्यात पथक पोहोचले. 

महाराष्ट्रात ‘सीसीआय’च्या सर्व १२७ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. कुठेही तक्रारी नाहीत. तरीही आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली जात आहे. शेतकऱ्याच्या कापूस खरेदीसाठी सीसीआय बांधील आहे. - एस.के. पाणीग्रही, मुख्य महाव्यवस्थापक, सीसीआय, मुंबई.   

टॅग्स :cottonकापूसNandedनांदेड