शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात पीएफआयचे आणखी सदस्य पोलिस आणि एटीएसच्या रडारवर

By शिवराज बिचेवार | Updated: September 23, 2022 17:14 IST

न्यायालयाबाहेर हे आरोपी पडताच बाहेर एटीएस गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे यंत्रणा अलर्टवर

नांदेड- टेरर फंडींग प्रकरणात एनआयए आणि एटीएसने गुरुवारी एकाच दिवशी देशभरात पापुलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. या कारवाईत नांदेडातून एक आणि परभणीतील चार जणांना पकडण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. परंतु न्यायालयाबाहेर हे आरोपी पडताच बाहेर एटीएस गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे यंत्रणा अलर्टवर असून पीएफआयचे आणखी सदस्य रडारवर असल्याची माहिती हाती आली आहे. 

नांदेड जिल्हा हा तसा पूर्वीचा सिमीचा गड होता. २००१ मध्ये या संघटनेवर देश विघातक कारवायामधील सहभागामुळे बंदी आणण्यात आली. त्यानंतर सिमीचे अनेक सदस्यांनी इतर संघटनांचा आश्रय घेतला. १९९९ मध्ये नांदेड शहरातील शारदा टॉकीजमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. आजम घौरी याच्या इंडीयन मुजाहिदीन या संघटनेने तो बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्याचबरोबर कामारेड्डी येथील सुधा टॉकीजमध्येही अशाचप्रकारे स्फोट झाला होता. या टॉकीजमध्ये अश्लील चित्रपट दाखवित असल्यामुळे स्फोट केल्याचे पकडलेल्या आरोपींनी सांगितले होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक लक्ष्मीनारायण यांनी या संघटनेची जिल्ह्यातील पाळेमुळे खणून काढली होती.

तसेच सिमीचे भोकर, अर्धापूर, धर्माबाद येथील सर्व नेटवर्क तोडले होते. विशेष म्हणजे घौरी याने धर्माबाद येथे लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा त्यावेळी लक्ष्मीनारायण यांनी जप्त केला होता. त्यांच्याच काळात कारवाईच्या भितीने सिमीचे कार्यकर्ते भूमिगत झाले होते. त्यानंतर अनेक दिवस जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. आता पापुलर फ्रंट ऑफ इंडीयावर केलेल्या कारवाईनंतर काही राज्यात हिंसक पडसाद उमटले आहेत. त्यामुळे नांदेडात पोलिस, एटीएस आणि गुप्तवार्ता विभाग अलर्टवर आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड