शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबादमध्ये मतदानासाठी पैसे वाटप, मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:44 IST

पैसे वाटपाच्या या आरोपांमुळे आणि मतदारांना डांबून ठेवण्याच्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धर्माबाद (नांदेड): धर्माबाद नगरपालिका निवडणुकीसाठी आज (२० डिसेंबर) मतदान पार पडत असतानाच शहरात एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका मंगल कार्यालयात मतदारांना पैसे वाटपासाठी कोंडून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या मतदारांची सुटका केली आहे. पैसे वाटपाच्या या आरोपांमुळे आणि मतदारांना डांबून ठेवण्याच्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ईनानी मंगल कार्यालयात नेमकं काय घडलं? शहरातील बन्नाळी भागातील ईनानी मंगल कार्यालयात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. सुमारे शंभर ते दीडशे मतदारांना येथे आणण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, पैसे वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आणि वातावरण बिघडले. यावेळी काही मतदारांनी "आम्हाला येथे कोंडून ठेवले आहे," असा गंभीर आरोप करत आरडाओरडा सुरू केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मंगल कार्यालयातील मतदारांना बाहेर काढले.

मतदान केंद्रावर नेत्यांमध्ये जुंपली! दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ८ मध्ये मतदान केंद्रावर राजकीय नेत्यांमध्ये थेट बाचाबाची झाली. भाजपच्या पुनम पवार आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट/शरद पवार गट) दिग्गज नेते कैलास गोरठेकर व शिवराज पाटील होटाळकर हे समोरासमोर आले. उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला पांगवले आणि मतदान प्रक्रिया सुरळीत केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Cash for votes alleged in Dharmabad; voters confined, rescued.

Web Summary : Dharmabad municipal polls marred by allegations of cash distribution and voter confinement in a marriage hall. Police intervened, rescuing voters. Tension also flared at polling booths between political leaders.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nandedनांदेड