शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नांदेड वाघाळा महापालिकेची मिशन कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:28 IST

उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या करवसुली मोहिमेला महापालिकेने प्रारंभ करताना पहिल्या टप्प्यात मालमत्ताधारकांसाठी वेगवेगळ्या सूट योजना जाहीर केल्या आहेत. त्याचवेळी या सूट योजनेनंतर थकित मालमत्ताधारकांच्या जप्तीची कारवाईही सुरु केली जाणार असल्याचे आयुक्त लहुराज माळी यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात सूट योजना : दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार जप्तीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या करवसुली मोहिमेला महापालिकेने प्रारंभ करताना पहिल्या टप्प्यात मालमत्ताधारकांसाठी वेगवेगळ्या सूट योजना जाहीर केल्या आहेत. त्याचवेळी या सूट योजनेनंतर थकित मालमत्ताधारकांच्या जप्तीची कारवाईही सुरु केली जाणार असल्याचे आयुक्त लहुराज माळी यांनी स्पष्ट केले.महापालिकेची एकूण चालू मागणी ५४ कोटींची आहे. तर ५० कोटी हे मागच्या वर्षीचे थकित आहे. एकूण थकबाकीवरील व्याजाचा आकडाही ५० कोटींवर आहे. त्याचवेळी २० कोटी अनधिकृत बांधकामावरील शास्ती रकमेचाही समावेश आहे. महापालिकेला १७४ कोटी रुपये वसूल करायचे आहेत.२०१८-१९ ची मागणी केलेल्या कराचा पूर्ण भरणा करुन चालू वर्षाच्या मालमत्ताकरात सप्टेंबरअखेर ४ टक्के, आॅक्टोबरअखेर ३ टक्के, नोव्हेंबरअखेर २ टक्के आणि डिसेंबर अखेर १ टक्का सूट देण्यात येणार आहे. आॅनलाईन मालमत्ताकर भरणाºयांनाही अतिरिक्त एक टक्का सूट आहे. त्याचप्रमाणे शास्तीमध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के, डिसेंबर २०१८ अखेर ७५ टक्के, मार्च २०१९ अखेर ५० टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही सूट महापालिकेच्या चालू कराच्या वर्षासाठी राहणार आहे.शहरात एकूण १ लाख १० हजार मालमत्ताधारक आहेत. एप्रिल २०१८ ते आजघडीपर्र्यंत शहरात १६ हजार ५०० मालमत्ताधारकांनी १२ कोटी २९ लाख ९६ हजार ७७५ रुपये कर भरला आहे. यामध्ये १ हजार ९५७ मालमत्ताधारकांनी आॅनलाईन कर भरला आहे. हा आकडा १ कोटी ३३ लाख ४९ हजार रुपये इतका आहे.दुसरीकडे, महापालिकेने वसुली मोहीम हाती घेतली असून पहिल्या टप्प्यात ज्या मालमत्तधारकांकडे एक लाखांच्यावर मालमत्ताकराची रक्कम थकली आहे, त्या मालमत्ताधारकांकडे वसुलीला प्राधान्य दिले जाणार आहे. थकित मालमत्ताकर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. शहरात असे १ हजार ६१५ मालमत्ताधारक असल्याचे कर विभागाचे उपायुक्त संतोष कंदेवार यांनी सांगितले. तरोडा प्रभागात १०९, अशोकनगर प्रभागात ४५०, शिवाजीनगर प्रभागात २४८, इतवारा प्रभागात १६०, सिडको प्रभागात १२६ आणि सर्वाधिक ५११ वजिराबाद प्रभागात एक लाखांहून अधिक कर थकलेले मालमत्ताधारक आहेत.उपायुक्त कंदेवार यांनी मालमत्ताकरासंदर्भात शहरातील वसुली लिपिकांची बैठक घेत सूचना केल्या. शहरात ८० वसुली लिपिक असून त्यांच्यावर २० पर्यवेक्षकांचे नियंत्रण राहणार आहे. एकूणच महापालिकेच्या दृष्टीने कर वसुलीमोहीम महत्त्वाची आहे. त्यातूनच पुढील विकासकामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.दहा लाखांपेक्षा अधिक कर थकलेल्यांची नावे होणार जाहीरमालमत्ताकर वसुलीदरम्यान महापालिकेने पहिल्या टप्प्यात एक लाखांपर्यंतच्या थकित कर असलेल्या मालमत्ताधारकांकडील वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांच्याकडील वसुलीसाठी जप्तीही केली जाणार आहे. मागील महिनाभरात २५ मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई केली. मोठ्या मालमत्ताधारकांवरही लक्ष केंद्रित करताना दहा लाखांपेक्षा जास्त कर थकवलेल्या मालमत्ताधारकांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. ही यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पेटीएमद्वारे कर स्वीकारणारी राज्यात नांदेड पहिली महापालिका

  • कर भरण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामध्ये आरटीजीएस, स्वॅप मशीन, आॅनलाईन ट्रान्सफर, नेट बँकींग, मोबाईल अ‍ॅप आदींद्वारे कर भरता येणार आहे. त्याचवेळी महापालिकेने पेटीएमद्वारे कर भरण्याची सुविधा नांदेड शहरातील मालमत्ताधारकांना उपलब्ध करुन दिली आहे. पेटीएमद्वारे मुन्सिपल टॅक्स आॅप्शनद्वारे मालमत्ताधारकांना आपला कर भरता येणार आहे.
  • राज्यात पेटीएमद्वारे मालमत्ता कर स्वीकारणारी नांदेड महापालिका पहिली महापालिका ठरली आहे. आजघडीला देशभरात ८ महापालिका पेटीएमद्वारे मालमत्ता कर स्वीकारतात. त्यात त्यात दिल्ली, अमृतसर, सोनीपथ, चेन्नई, विशाखापट्टनम, फरिदाबाद, गुडगाव आणि कर्नाल या ८ महापालिका आहेत. नांदेड महापालिका आता देशभरात ९ व्या क्रमांकाची ठरली आहे.
टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTaxकरPaytmपे-टीएम