शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री साहेब, कुठंय औषधी? खोट्या दाव्याने रूग्णांचे नातेवाईक अन् डॉक्टरांमध्ये होतोय वाद...

By श्रीनिवास भोसले | Updated: October 5, 2023 15:22 IST

आम्ही टिव्हीत पाहिलं, औषधी आहे, तुम्ही का देत नाही, म्हणत रूग्णांच्या नातेवाईकांचा डॉक्टर, नर्ससोबत वाद

नांदेड: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुबलक औषधी असल्याचा दावा केला आहे. परंतु, आजही चिठ्ठी देवून खासगीतून गोळ्या-औषधी आणायला लावली जात आहेत. प्रशासन आणि शासनाच्या खोट्या आश्वासनांमध्ये रूग्ण आणि डॉक्टरांमध्येच वैर निर्माण होत आहे. 

एकीकडे प्रशासन आणि शासन औषधी असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे रूग्णालयात औषधी नसल्याने डॉक्टर, नर्स ती चिठ्ठीवर लिहून देत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होवून नातेवाईक डॉक्टर, नर्सच्या अंगावर धाऊन येत आहेत. आम्ही टिव्हीत पाहिलं... औषधी आहे.. तुम्ही का देत नाही... त्यातून डॉक्टर, नर्स आणि रूग्णांच्या नातेवाईकात वाद निर्माण होत आहेत. मात्र, या अनास्थेला जबाबदार असणारी रूग्णालयातील अधिकारी मंडळी आणि दावा करणारे शासनकर्ते नामानिराळे आहेत.

सुप्रिया सुळेंसमोर मातेला अश्रू अनावरहातपाय वाकडे झाले...बाळाला झटके येत होते. बघा बघा म्हणून विनवण्या केल्या... तरी बघत नव्हते... या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना मी कसं शांत राहू... मला १२ वर्षानंतर बाळ झालं हाेतं. त्याचाही जीव घेतला हो...या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून टाकले.

चार दिवसात मृत्यूचे अर्धशतकविष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. मागील 24 तासात आणखी 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक झाले आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलHasan Mushrifहसन मुश्रीफ