शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सीमावर्ती प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी बिलोली येथे घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:06 IST

जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या सिमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन या भागातील समस्या व विकासाची कामे यावर जवळपास एक तास चर्चा केली. या चर्चेत त्यांच्या अधिकारातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आणि सीमावर्ती प्रश्नासाठी बिलोलीत स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी डोंगरे यांची शिष्टमंडळासोबत तासभर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या सिमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन या भागातील समस्या व विकासाची कामे यावर जवळपास एक तास चर्चा केली. या चर्चेत त्यांच्या अधिकारातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आणि सीमावर्ती प्रश्नासाठी बिलोलीत स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे सांगितले.नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सीमावर्ती भागातील दीड महिन्यापासून विविध बैठका घेण्यात आल्या. प्रारंभी तेलंगणा जाण्याविषयी प्रश्न मांडण्यात आले होते, मात्र यापेक्षा विकास कामे करून घेऊ, ही बाब महत्वाची असल्याचे सवार्नुमते ठरले. ठिकठिकाणच्या बैठकीमध्ये आमदार सुभाष साबणे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याशी संवाद झाला होता.दरम्यान, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी २८ जून रोजी सिमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात शिष्टमंडळास पाचारण केले होते. त्या अनुषंगाने बैठकत विविध प्रश्नांविषयी एक तास चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना १७ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.बैठकीत मालगुजारीचा प्रश्न, नाफेड खरेदी केंद्राचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न, तातडीने निकाली काढण्यात आला. शिष्टमंडळात सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, गंगाधरराव प्रचंड, राजेंद्र पाटील शिंपाळकर, राजेंद्र पाटील कारलेकर, सुभाष पवार, श्रीनिवास दमय्यावार, जावेद सेठ, बालाजी महाजन, देविदास कोंडलाडे, गंगाधरराव गटुवार, प्रकाश जोशी, गंगाधर कोंडावार, शंकर गायकवाड, सावळे गोविंद, लोखंडे चंद्रकांत यांची उपस्थिती होती.दरम्यान सिमावर्ती भागातील प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे या विषयावर बिलोलीत स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर राज्य आणि केंद्र शासनाच्या अधिकारातील प्रश्नाबाबत शिष्टमंडळातील भावना कळविणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडTelanganaतेलंगणा