शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

करणी केल्याच्या संशयातून कोपरा येथे विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:10 IST

मुलगा होण्यासाठी सासरची मंडळी करीत असलेल्या छळाला कंटाळून विवाहिता भोंदूबाबाच्या नादी लागली. यातूनच तिने सासरच्या मंडळींना करणी केल्याच्या संशयावरुन विवाहितेला गळफास लावून जिवे मारल्याची घटना कोपरा (ता.हदगाव)येथे २९ जून रोजी घडली. ३ जुलै रोजी याप्रकरणी तामसा पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पतीस अटक केली.

ठळक मुद्देपती अटकेत : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : मुलगा होण्यासाठी सासरची मंडळी करीत असलेल्या छळाला कंटाळून विवाहिता भोंदूबाबाच्या नादी लागली. यातूनच तिने सासरच्या मंडळींना करणी केल्याच्या संशयावरुन विवाहितेला गळफास लावून जिवे मारल्याची घटना कोपरा (ता.हदगाव)येथे २९ जून रोजी घडली. ३ जुलै रोजी याप्रकरणी तामसा पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पतीस अटक केली.कोपरा येथील विवाहिता फरहानबी नजिरखान पठाण (वय २६) हिचे माहेर ढाणकी (ता. उमरखेड) येथील आहे. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह नजीरखानसोबत झाला होता. त्यांना एक मुलगीही आहे. पती व सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता, मात्र मुलगा होत नसल्याने फरहानबीचा सासरी छळ सुरु झाला. याशिवाय रिक्षा व सेट्रींगच्या कामाचे साहित्य घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, अशी मागणीही होवू लागली. पीडितेने या घटनेची माहिती माहेरीही दिली. दरम्यान, सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने कोपरा येथील दर्गा येथे असणाऱ्या भोंदूबाबा म. अलिबाबा शेख वजीर पठाण यांच्याकडे जावून ती मुलगा होण्यासाठी काय करावे लागेल, याचा सल्ला घेवू लागली. भोंदूबाबाकडे जाण्यास सासरच्या मंडळींचा विरोध होता. मात्र तिने जाणे थांबविले नाही. याच दरम्यान सासरच्या एका महिलेला कथित भानामतीची बाधा झाली. ही भानामती सून व भोंदूबाबाने केल्याचा संशय सासरच्या मंडळींचा होता. यावरुनही पीडिता व सासरच्या मंडळींमध्ये वादविवाद वाढले. २९ जूनला विवाहिता घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. त्याच दिवशी रात्री तामसा पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदही घेतली.---सात जणांचा पोलिसांकडून शोध सुरूशासकीय रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. २ जुलै रोजी मयताचा भाऊ सय्यद लतीफ सय्यद पीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तामसा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खून, शारीरिक व मानसिक छळ करणे आदी आरोपांखाली गुन्हे नोंदविण्यात आले. याशिवाय जादुटोणाविरोधी कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये पती नजिरखान, त्याचा भाऊ मुस्ताकखान, महेमूदखान, शरीफखान, दोन महिला व इतर अशा ८ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित ७ जणांचा शोध सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडMurderखूनPoliceपोलिस