घडली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका २३ वर्षीय विवाहितेला सासरी नालंदानगर येथे सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेराहून
दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिचा शारीरिक छळ करण्यात आला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.
किनवटमध्ये मटका अड्ड्यावर धाड
नांदेड : किनवट येथे रेल्वे पटरीच्या बाजूला सुरू असलेल्या टाइम नावाच्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी १ जून
रोजी धाड टाकली. या धाडीत ३ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल भोळ
यांच्या तक्रारीवरून किनवट ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अवैध दारू पकडली
नांदेड : चोरटी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केलेली ५ हजार २८० रुपयांची दारू नांदेड ग्रामीण
पोलिसांनी जप्त केली. वाजेगाव ते पुणेगाव रस्त्यावर ही दारू जप्त करण्यात आली. पोहेकॉ सखाराम नवघरे
यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.