शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात मार्च एंडिंगची लगीनघाई; निधी पडून, टेबलावरची फाईल आता घेणार गती

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 6, 2024 18:55 IST

शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेतील चित्र

नांदेड: मार्च एंडिंग आता जवळ येऊ लागला असल्याने विविध योजनांचा निधी ३१ मार्चपूर्वी कसा खर्च करता येईल, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका यासह सर्वच शासकीय कार्यालयात मार्च एंडिंगची लगीनघाई पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेंतर्गत विकासकामासांठी निधी उपलब्ध होत असतो. हा निधी दिलेल्या आर्थिक वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे, अन्यथा अनेकवेळा उपलब्ध निधी वेळेत खर्च न झाल्याने तो परत पाठवावा लागतो. शासनाचा निधी विकासाच्या विविध बाबींवर खर्च व्हावा, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तसे नियोजन सुरू असल्याचे चित्र अनेक शासकीय कार्यालयांत दिसून येत आहे.

अनेक कामांना वर्क ऑर्डर मिळूनही ती कामे सहा महिने लोटली तरी सुरू झालेली नसतात, तर काही कामे वेळेत पूर्ण करूनही त्याचा निधी शासनस्तरावर प्रलंबित असतो. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विभागामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे दिसून येते. विविध विकासकामे केलेल्या संस्था, कंत्राटदारही कामाचे बिल वेळेत मिळावे, यासाठी शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांत चकरा मारताना दिसत आहेत. म्हणून गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत व महापालिकेत येणाऱ्या कंत्राटदार तत्सम व्यक्तींची संख्या वाढलेली आहे.

टेबलावरची फाईल घेणार गतीएखाद्या कामाची शासकीय कार्यालयातील टेबलावर अनेक महिन्यांपासून फाईल पडून असते. पण, संबंधित कर्मचारी त्या फायलींचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घेत नाही, पण आता मार्च जवळ येऊ लागल्याने टेबलावरच असलेल्या फाईल आता गती घेत आहेत.

पंचवीस पंधरांची अनेक बिले रखडलीजिल्ह्यात विविध आर्थिक वर्षात कामे केलेली अनेक बिले मागील चार ते पाच वर्षांपासून रखडली आहेत. संबंधित विभागाकडून फायली वरिष्ठ कार्यालयात पाठविल्या जातात, पण वरिष्ठांकडून विविध कारणे दाखवत त्या फायली परत बांधकाम विभागाकडे पाठविल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची बिले गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nandedनांदेड