शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:46 IST

अराजकीय संघटना असलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेने मंगळवारी मराठवाडा विकासाचा जाहीरनामा प्रकाशित केला़

नांदेड : अराजकीय संघटना असलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेने मंगळवारी मराठवाडा विकासाचा जाहीरनामा प्रकाशित केला़ हा जाहीरनामा लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांसमोर मांडण्यात येणार आहे़ अशी माहिती अध्यक्ष डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी दिली़मराठवाड्यात उद्योगवाढीसाठी धोरण असले पाहिजे़ हिंगोलीला ‘ना उद्योग जिल्हा’ म्हणून जाहीर केले़ पुणे,मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथे उद्योगांचे केंद्रीकरण करण्याऐवजी दूरस्थ ठिकाणी रेल्वे, रस्ते, विमानतळ आदी वाहतुकीच्या सोयी वाढवून उद्योगांना आकर्षित करावे, नवीन उद्योग सुरु करण्याचे धोरण मागास भागाला समोर ठेवून करण्यात यावे़, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याला जोडणारे चौपदरी रस्ते प्राधान्यक्रमाने तयार करावेत़औरंगाबाद शहराचे सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेवून आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मुंबई, हैदराबादला जोडणाऱ्या सुपरफास्ट गाड्या देण्यात याव्यात. औरंगाबादला विभागीय विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी़ सोलापूर-जळगाव तसेच औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात पाण्याची सोय व्हावी, जायकवाडी कालवा दुरुस्त करुन शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी़, टेक्सटाईल पार्क व अन्य उद्योग प्राधान्यक्रमाने सुरु करावेत, पैनगंगा व कयाधूचे पाणी जिल्ह्यातील शेतीसाठी मिळावे, नांदेडला आयुक्तालय सुरु करावे़, लेंडी धरण पूर्ण करावे, कृष्णूरसकट इतर एमआयडीसीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, लातूरला कायमस्वरुपी योजना देवून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा़ यासह इतर जिल्ह्यांतील मागण्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे़यावेळी डॉ़ व्यंकटेश काब्दे, इंजि़ द़ मा़ रेड्डी, सदाशिव पाटील, सोपानराव मारकवाड, शंतनू डोईफोडे, उमाकांत जोशी, डॉ़ डी़ यू़ गवई, प्रा़ डॉ़लक्ष्मण शिंदे, निर्मला पाटील, प्रा़ डॉ़भोवरे, एस़ डी़ बिलोलीकर, प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार, चंद्रकांत जटाळ, गोविंदराव सिंधीकर यांची उपस्थिती होती़

टॅग्स :nanded-pcनांदेडMarathwadaमराठवाडा