शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठी ही ज्ञानभाषा म्हणून टिकली पाहिजे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:50 IST

जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे

नांदेड : जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे तरच मराठी ही ज्ञानभाषा म्हणून टिकेल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय कार्यालय लातूरच्या वतीने पीपल्स कॉलेजमध्ये आयोजित ‘मराठी भाषेचे भवितव्य’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपपर भाषणात बोलत होते. कुलगुरु डॉ. वाघमारे म्हणाले, जागतिकीकरणामुळे स्थानिक भाषांचा होत असलेला लोप आणि मराठी भाषकांची उदासीनता याबद्दल चिंता व्यक्त करुन वाढत्या स्थलांतरामुळे आपण आपल्या भाषेपासून तुटत चाललो आहोत, ही बाब निदर्शनास आणून दिली.यावेळी परिसंवादात प्रा. डॉ. अनंत राऊत आणि प्रा. डॉ. केशव देशमुख यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. श्यामल पत्की, प्राचार्य आर.एम. जाधव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी तर आभार प्रा. कल्पना जाधव यांनी मानले.

टॅग्स :nanded-pcनांदेडJanardan Waghmareजनार्दन वाघमारेmarathiमराठी