शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

पक्षासोबत अपक्षांचेही पीक आले जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:14 IST

लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला असता पहिल्या काही लोकसभा निवडणुकांत प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह मोजकेच उमेदवार रिंगणात उतरायचे.

ठळक मुद्देयंदा १४ जण रिंगणात १९८७ पर्यंत उमेदवार होते दहाच्या आत

विशाल सोनटक्के।नांदेड : लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला असता पहिल्या काही लोकसभा निवडणुकांत प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह मोजकेच उमेदवार रिंगणात उतरायचे. मात्र मतदारांसोबत नोंदणीकृत पक्षांची संख्या वाढत गेली. त्यामुळे १९८७ च्या लोकसभा निवडणुका पाहिल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत दहांहून अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसून येते.१९५१ साली पार पडलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ६ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्टÑीयकृत तसेच नोंदणीकृत पक्षाचे ५ तर केवळ १ अपक्ष मैदानात उतरला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोविंदराव तानाजी महाले यांनीही ३९ हजार ११२ मते खेचली होती. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत तर अवघे ४ उमेदवार रिंगणात होते. भारतीय राष्टÑीय काँग्रेसकडून देवराव कांबळे आणि बिंदू दिगंबरराव तर शेड्यूल्डकास्ट फेडरेशनकडून हरिहर सोनुले आणि पीएसपीकडून विजेंद्र काबरा यांनी नशीब आजमाविले होते. यातील देवराव कांबळे आणि हरिहर सोनुले हे दोघे निवडून आले होते.१९६२ च्या निवडणुकीतही लोकसभेसाठी चौरंगी सामनाच रंगला होता. नोंदणीकृत पक्षाचे २ तर दोघा अपक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली होती. १९६७ मध्येही केवळ चारच उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या व्ही. बी. तरोडेकर यांनी ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवित एकतर्फी विजय मिळविला होता. १९७१ ची निवडणूक ही तरोडेकर यांनीच जिंकली. या निवडणुकीत त्यांनी तब्बल ६४.४४ टक्के इतकी मते घेतली होती. प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत आंबेडकर यांना २५.६० टक्के मते मिळाली होती. आंबेडकर हे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत तर थेट दुरंगी लढत झाली होती. पीडब्ल्यूपी पक्षाकडून उतरलेल्या केशवराव धोंडगे यांचा काँग्रेसच्या गोविंदराव म्हैसकर यांच्याशी थेट सामना झाला होता. म्हैसकर यांना ३२.०९ टक्के मते मिळाली तर ही निवडणूक जिंकलेल्या केशवराव धोंडगे यांना ६७.९१ टक्के मते मिळाली होती.१९८० च्या निवडणुकीत शंकरराव चव्हाण काँग्रेसच्या वतीने पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. या निवडणुकीत ५ उमेदवार रिंगणात होते. शंकरराव चव्हाण यांची लढत पीडब्ल्यूपीच्या केशवराव धोंडगे यांच्याशी झाली होती. शंकरराव चव्हाण यांनी तब्बल १० टक्के मते अधिक घेत विजय मिळविला होता. १९८४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच अपक्षांची संख्या वाढल्याचे दिसून येते. तत्कालीन विद्यमान खा. शंकरराव चव्हाण आणि आईसीएसचे कमलकिशोर कदम यांच्यात त्यावेळी सामना रंगला होता. यावेळी ६ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार कमलकिशोर कदम यांच्यापेक्षा दुप्पटीहून अधिक मते घेत शंकरराव चव्हाण हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेत विजयी झाले होते. कमलकिशोर कदम यांना १ लाख ३४ हजार ५०२ इतकी मते मिळाली होती. तर शंकरराव चव्हाण यांना ३ लाख ६ हजार २६ मते मिळाली होती.१९८७ साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षाकडून अशोक चव्हाण हे एकमेव उमेदवार रिंगणात होते तर ७ उमेदवार अपक्ष म्हणून नशीब अजमावित होते. या निवडणुकीत अशोक चव्हाण विरोधात प्रकाश आंबेडकर असा सामना रंगला होता. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते़ त्यात अशोक चव्हाण यांना २ लाख ८३ हजार १९ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७१ हजार ९०१ मतांवर समाधान मानावे लागले. पाच अपक्ष उमेदवारांना पाच हजाराहुन कमी मते मिळाली़मतदारांसोबत वाढत गेली उमेदवारांचीही भाऊगर्दी१९८९ च्या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत व्यंकटेश काब्दे विरुद्ध अशोक चव्हाण असा सामना रंगला होता. यात चव्हाण यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. या निवडणुकीत तब्बल ९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. १९९१ च्या निवडणुकीत २० उमेदवारांनी नशीब आजमाविले. यात काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील विजयी झाल्या होत्या. तब्बल १५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९९६ च्या निवडणुकीतही असेच विक्रमी उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसून आले. तब्बल २४ जणांनी ही निवडणूक लढली. यात तब्बल १८ अपक्ष उमेदवारांचा सहभाग होता. १९९८ मध्ये उमेदवारांची ही संख्या काहीशी कमी झाली. मात्र तरीही १३ जण रिंगणात होते. १९९९ मध्ये ७ जणांनी निवडणूक लढविली तर २००४ मध्ये पुन्हा १३ उमेदवार रिंगणात उतरले. २००९ मध्ये उमेदवारांची हीच संख्या २२ वर पोहोचली. तर २०१४ मध्ये ती २४ इतकी झाली. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही काँग्रेसच्या वतीने अशोकराव चव्हाण ८१ हजारांहून अधिक मते घेत विजयी झाले होते.भास्कररावांना तीनवेळातर चौघांना दोनदा संधीनांदेड लोकसभा मतदारसंघाने तब्बल चार उमेदवारांना दोनदा निवडून येण्याची संधी दिली. देवराव कांबळे १९५१ आणि १९५७ ला निवडून आले. तर त्यानंतर व्ही. बी. तरोडेकर यांना १९६७ आणि १९७१ अशी सलग दोनदा संधी मिळाली. शंकरराव चव्हाण यांचाही १९८० आणि १९८४ अशा सलग दोन निवडणुकांत विजय झाला. तर अशोकराव चव्हाण यांना १९८७ आणि २०१४ मध्ये मतदारांनी संसदेत पाठविले. तत्कालीन काँग्रेसच्या भास्करराव पाटील खतगावकरांना या मतदारसंघातून सर्वाधिक जास्त म्हणजे तीनवेळा संधी मिळाली. खतगावकर हे १९९८, १९९९ आणि २००९ मध्ये विजयी झाले होेते. यंदाच्या निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत़ त्यांची लढत भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित आघाडीच्या प्रा़ यशपाल भिंगे यांच्यासोबत होत आहे़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडElectionनिवडणूक