शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माहूर शहरातील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:55 IST

दुस-याच दिवशी सा़ बां़ विश्रामगृहाच्या मागील बाजूस नियोजित सभागृहाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारकांच्या मनात धडकी भरली आहे़

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी मोहीम अनेक अतिक्रमणांवर पडला हातोडा

श्रीक्षेत्र माहूर : गेल्या पाच महिन्यांपूर्वी माहूर नगरपंचायतला रूजू झालेल्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी काल ४० वर्षांपूर्वीचे अतिक्रमण काढल्याने त्यांच्या कामाची चर्चा सुरू आहे़ दुस-याच दिवशी सा़ बां़ विश्रामगृहाच्या मागील बाजूस नियोजित सभागृहाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारकांच्या मनात धडकी भरली आहे़१८ रोजी नगरपंचायतच्या जागेवर असलेले संजय गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे ९ गाळे ४० वर्षांआधी बांधण्यात आले होते़ या गाळ्यांत दुकानदारांनी भाडेवाढ न करता परस्पर गाळे विक्री केल्याच्या घटना घडल्याच्या चर्चा होत होत्या़ तसेच सदरील गाळ्यांचे बांधकामही धोकादायक स्थितीत आल्याने ऩ प़ कडून गाळे रिकामे करण्यासाठी लेखी पत्र देण्यात आले होते़ त्या पत्रावरून हे गाळे पाडू नये म्हणून न्यायालयातून स्थगिती मिळविण्यात आल्याने येथे उभे राहणारे नियोजित कॉम्प्लेक्सचे कामही रखडले होते़१८ रोजी मुख्याधिकारी विद्या कदम यांनी न्यायालयीन प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण करून अतिक्रमण पथकप्रमुख कार्यालय अधीक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी यांना ९ गाळे पाडण्याचे आदेश दिल्याने हे गाळे जमीनदोस्त करण्यात आले़ त्यामुळे आता येथे गाळे उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ऩप़च्या उत्पन्नात मोठी भर पडून शेकडो नागरिकांचे दुकानदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे़१९ रोजी मुख्याधिकारी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पथकप्रमुख वैजनाथ स्वामी यांच्यासह २ जेसीबी, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, पो़नि़ लक्ष्मण राख यांच्यासह पोलीस कर्मचारी ५० मजुरांसह प्रभाग क्ऱ १७ मधील सदर अतिक्रमण काढले़ दत्तजयंती यात्रेनंतर शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने अतिक्रमणधारकांनी आमचे अतिक्रमण काढू नये असे विनंतीवजा पत्र दिल्याची चर्चाही अनेक ठिकाणी होत होती़

टॅग्स :NandedनांदेडEnchroachmentअतिक्रमण