शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Maharashtra Election 2019: पराभवाच्या छायेने अनेक उमेदवारांचे अवसान गळाले; अंतिम टप्प्यात खर्चासाठी घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:02 IST

Maharashtra Election 2019: निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़

ठळक मुद्देआमदारकीच्या स्वप्नासाठी संपत्तीची विक्रीखर्चापाणी बंद झाल्याने ऐनवेळी कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवाराचा झेंडा हाती घेत आहेत़

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत १९ आॅक्टोबर हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे़ त्यानंतर दोन दिवसांनी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे़ परंतु, त्यापूर्वीच मतदारसंघातील जनतेच्या कौलाचा अंदाज घेत पराभवाच्या छायेतील उमेदवारांचे अवसान गळाले आहे़ त्यामुळे अशा अनेक उमेदवारांनी खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ खर्चापाणी बंद झाल्याने ऐनवेळी कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवाराचा झेंडा हाती घेत आहेत़

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांनी आमदारकीचे स्वप्न पाहत उडी घेतली़ पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतरही कार्यकर्त्यांनी दिलेल्या उसन्या अवसानावर रिंगणात उतरले आहेत़ त्यात निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़ ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत काही उमेदवारांनी तर मुंबईतील फ्लॅट अन् गावाकडच्या शेतजमिनींचा सौदा केला़ दिग्गज उमेदवारांना बजेटची चिंता नसली तरी, ऐनवेळी रोख रक्कम तीही मुबलक प्रमाणात असण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़ अशांच्या मदतीला त्यांचेच हितचिंतक धावून आले़ दिवसेंदिवस निवडणुका महाग होत चालल्या आहेत़ त्यामुळे पैसे खर्च करण्यात हात आखडता घेणारे कार्यकर्ते मग रिंगणात कशाला उतरलात?  असे खोचक प्रश्न विचारत आहेत

निवडणुकीची रणधुमाळी  अंतिम टप्प्यात आली़ १९ आॅक्टोबर हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे़ त्यामुळे २१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर सभा अन् रॅली काढता येणार नाहीत़ परंतु अंतर्गत प्रचार मात्र सुरु राहणार आहे़ त्यामुळे या काळातही खर्च सुरुच राहील़ परंतु आताच अनेक उमेदवारांचे पराभवाच्या छायेत अवसान गळाले आहे़ त्यामुळे खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ त्यामुळे कार्यकर्तेही संतप्त झाले आहेत़ ऐनवेळी या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या उमेदवाराचा झेंडा हाती घेतला आहे़ तर काही उमेदवारांनी थेट अन्य उमेदवाराला पाठींबा दिला आहे़ 

आमदारकीच्या स्वप्नासाठी संपत्तीची विक्रीनिवडणूक म्हटले की, अफाट खर्च आलाच़ निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चासाठी २५ लाखांची मर्यादा घालून दिली असली तरी, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक खर्च करण्यात येतो हे सर्वश्रुत आहे़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हजारो कोटी रुपयांचा चुराडा होतो़ निवडून येण्याची खात्री असलेल्या अनेक उमेदवारांना रोख रकमेची चणचण भासू लागली आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्याजवळील शेतजमीन, घर, फ्लॅट यांचे सौदे करुन त्याद्वारे रक्कम उभी केली आहे़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिणbhokar-acभोकरloha-acलोहाdeglur-acदेगलूर