शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

Maharashtra Election 2019 : बंडखोरांनी वाढविली नांदेडात सेनेची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 12:33 IST

 युतीमध्ये ५ मतदारसंघ सेनेला तर ४ मतदारसंघात भाजप

ठळक मुद्देनांदेड दक्षिणमध्ये बहुरंगीदोन ठिकाणी चौरंगी तर सहा मतदारसंघांत तिरंगी लढत

- विशाल सोनटक्के  

नांदेड : जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतून तब्बल १९३ जणांनी माघार घेतल्याने  आता १३५ जण रिंगणात राहिले. यात सर्वाधिक ३८ उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये तर सर्वात कमी ५ उमेदवार मुखेड मतदारसंघात  आहेत.  युतीमध्ये ५ मतदारसंघ सेनेला तर ४ मतदारसंघात भाजप निवडणूक लढवित असली तरी  सेनेच्या तिघांना बंडखोरांनीच आव्हान दिले.  सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये

सर्वाधिक ३८ उमेदवार नांदेड दक्षिण मतदारसंघांत असून या ठिकाणी शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यासमोर भाजपचे शहर महानगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन रिंगणात उतरलेले  दिलीप कंदकुर्ते यांचे आव्हान कायम राहिले आहे. येथून काँग्रेसतर्फे मोहनराव हंबर्डे तर वंचिततर्फे फारुख अहमद रिंगणात आहेत. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही बंड कायम ठेवल्याने बहुरंगी लढत होणार  आहे. 

हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे आ. नागेश पाटील आष्टीकर सलग दुसºयावेळी मैदानात उतरले आहेत. मात्र त्यांनाही बंडाचा सामना करावा लागत आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. येथे काँग्रेसतर्फे माधवराव पाटील तर वंचित बहुजन आघाडीतर्फे सुदर्शन भारती महाराज निवडणूक रिंगणात आहेत.   

लोहा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे मुक्तेश्वर धोंडगे निवडणूक रिंगणात आहेत. येथे राष्टÑवादीने युवक प्रदेशाध्यक्ष दिलीप धोंडगे यांना संधी दिलीे तर वंचितने शिवा नरंगले या कार्यकर्त्यास मैदानात उतरविले आहे. मात्र धोंडगे यांचा मुख्य सामना शेतकरी कामगार पक्षाचे निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांच्याशी होणार आहे. शिंदे हे भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे असून लोहा मतदारसंघात चिखलीकर यांचा प्रभाव असल्याने येथेही  िसेनेसमोर मतविभाजनाचे संकट  आहे. 

नांदेड दक्षिणमधून काँग्रेसचे माजी उपमहापौर विनय गिरडे यांनी  उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मोहन हंबर्डे यांना दिलासा मिळाला आहे. तर नांदेड उत्तरमधून भाजपचे मिलिंद देशमुख आणि बंडू पावडे यांंनी उमेदवारी मागे घेतल्याने  शिवसेना उमेदवार बालाजी कल्याणकर, काँग्रेस उमेदवार  डी. पी. सावंत, वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद चावरे अशी तिरंगी लढत होणार आहे. किनवटमध्ये भाजप उमेदवार भीमराव केराम यांना मोठा दिलासा मिळाला. भाजपकडून  इच्छुक असलेल्या संध्या राठोड आणि धरमसिंह राठोड (अपक्ष), शिवसेनेचे ज्योतीबा खराटे  या तिघांनीही आपले अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढत होत आहे. राष्टÑवादीतर्फे प्रदीप नाईक तर वंचित आघाडीतर्फे हमराज उईके येथून रिंगणात आहेत.  भोकर मतदारासंघातही तिरंगी सामना रंगणार आहे. सोमवारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नायगाव, देगलूर, मुखेडात तिरंगी सामना आहे. 

भोकरमधून विक्रमी ८४ उमेदवारांची माघारउमेदवारांच्या विक्रमी संख्येने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या भोकर मतदारसंघात आता उमेदवारांच्या माघारीनेही विक्रम केला असून ९१ पैकी ८४ उमेदवारांनी या मतदारसंघातून सोमवारी माघार घेतली. या मतदारसंघात १४७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते़ छाननीत ९८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते़ ४९ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले़  सोमवारी सकाळी ११ वाजेपासूनच भोकर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांनी माघार घेण्यासाठी उपस्थिती दर्शविली़ भोकर मतदारसंघात आता काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब गोरठेकर, वंचित बहुजन आघाडीचे नामदेव नागोराव आयलवाड, बसपाचे रत्नाकर श्यामराव तारू या प्रमुख उमेदवारासह अन्य तीन असे सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत़ 

वंचित बहुजन आघाडी, बंडखोरांमुळे चुरसशिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीबरोबरच काही मतदारसंघात शिवसेना-भाजपचे बंडखोर उमेदवार उभे आहेत. तर  ३ मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार उभे आहेत. याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेडसह शिवा संघटनेनेही काही ठिकाणी उमेदवार दिल्याने कोण कोणाची मते खातो, यावरच प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरणार असल्याचे दिसते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nandedनांदेड