शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Maharashtra Election 2019 : काँग्रेस-सेनेपुढे वंचित, अपक्षांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:24 IST

भाजप कार्यकर्त्यांनी देगलूर मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी केला होता प्रयत्न

ठळक मुद्देचौरंगी लढत होण्याची शक्यता  

- श्रीधर दीक्षित

देगलूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात नऊ उमेदवार असले तरी काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर, शिवसेनेचे आ. सुभाष साबणे, वंचित बहुजन आघाडीचे रामचंद्र भरांडे आणि शिवा संघटनेचे बालाजी बंडे या चार उमेदवारांमध्ये लढत होत आहे. प्रचारासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांच्या, पक्ष पदाधिकाºयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरोघरी गाठीभेटी सुरु आहेत. 

देगलूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर अंतापूरकर व त्यानंतर साबणे यांना  एक एक वेळ प्रतिनिधित्व करण्याची संधी येथील मतदारांनी दिली. यावेळेस हे दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. शिवा संघटनेचे बालाजी बंडे व वंचित आघाडीचे रामचंद्र भरांडे यांनी अल्पकाळात वातावरणनिर्मिती व दखलपात्र प्रभाव दाखविला आहे. परंतु या दोघांनाही मिळणाऱ्या मतांचा फटका अंतापूरकर व साबणे यांनाच बसणार हे अगदी स्पष्ट आहे. 

देगलूर मतदारसंघ भाजपाला सोडवून घ्यावा, युती झाल्यास सुभाष साबणे उमेदवार नकोत, अशी भूमिका घेतलेल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना राजी करून प्रचारामध्ये सक्रिय करण्यात अखेर साबणे यशस्वी झाले. त्यामुळे युती आता एकसंघ झाल्याचे दिसून येत आहे. अशीच कसरत अंतापूरकर यांनादेखील करावी लागली. तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांनी ग्रामीण भागातील मोर्चा सांभाळला आहे. नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व शहराध्यक्ष शंकर कंतेवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर नगर परिषदेतील काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्यदेखील जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आघाडीधर्म पाळत आहे तर दुसरा गट अद्यापही तटस्थ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसांत आणखी काय घडामोडी घडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- देगलूर तालुक्यातील शेतक-यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अनेक वर्षांपासून रखडलेले लेंडी धरण़ शेतापर्यंत पाणी उपलब्ध झाल्यास  या भागातील शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे.  प्रकल्पग्रस्तांचा मोबदला, पुनर्वसित गावांत मूलभूत सुविधा देण्याची गरज़- देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा विस्तार झाला. ट्रामा केअर सेंटरची स्वतंत्र इमारतदेखील झाली. परंतु येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नाही़ मागासवर्गीयांना  स्मशानभूमीसाठी जागेची उपलब्धता़- अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या तेलंगणा भागातील कामास सुरुवात झाली. परंतु या भागात अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. उदगीर राज्य मार्गाची तर अतिशय दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागात अद्याप चांगल्या रस्त्यांचे जाळे होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावापर्यंत रस्त्यांची गरज आहे़ परंतु, अद्यापही त्यादृष्टीने काम झाले नाही़ 

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूसुभाष साबणे (शिवसेना)योजना राबवितानाच शेतक-यांना पीकविमा भरणे, तो मिळवून देणे यासाठी साबणे यांनी प्रयत्न केले. येथील धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. देगलूर तालुक्यातील शेकडो रुग्णांना नामांकित रुग्णालयात उपचार मिळाले़

रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर देखील अंतापूरकर यांनी पक्षाच्या आंदोलनाच्या निमित्ताने संपर्क कायम ठेवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीमध्ये सक्रिय राहिल्याने काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे़ 

रामचंद्र भरांडे (वंचित आघाडी)मागासवर्गीय चळवळीतील कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या रामचंद्र भरांडे यांनी आंदोलन व निवडणुकीच्या माध्यमातून या मतदारसंघात आपली सक्रियता दाखविली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देगलूर मतदारसंघात उल्लेखनीय मते घेतली होती.

बालाजी बंडे (शिवा संघटना)शिवा संघटनेमध्ये सक्रिय असलेला तरुण कार्यकर्ता हीच प्रमुख ओळख असलेल्या बालाजी बंडे यांची प्रमुख मदार लिंगायत समाजावर आहे. दोन प्रमुख उमेदवारांच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित करून अन्य समाजातील मतदारांना ते आकर्षित करीत आहेत़

2०14चे चित्र- सुभाष साबणे(शिवसेना)  - रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस-पराभूत)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019deglur-acदेगलूरNandedनांदेड