शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान;१३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 16:29 IST

काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ

ठळक मुद्देसकाळी ११ नंतर मात्र पाऊस थांबल्याने सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली.

नांदेड : जिल्ह्यात नऊ मतदारसंघांसाठी सोमवारी काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात जवळपास ६५ टक्के मतदान झाले असून अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यत प्राप्त झाली नव्हती. दरम्यान, या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह प्रदीप नाईक, वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, डॉ. तुषार राठोड, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह जिल्ह्यातील १३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे.सोमवारी सकाळी सात वाजेपासून जिल्ह्यातील २ हजार ९६२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे उशिरा मतदान सुरु झाले. सकाळी ११ नंतर मात्र पाऊस थांबल्याने सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली.

नांदेड दक्षिण मतदारसंघात राज्यात सर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्या खालोखाल नांदेड उत्तर मतदारसंघात २४ उमेदवार आहेत तर हदगाव आणि किनवट मतदारसंघात प्रत्येकी १५, भोकर मतदारसंघात ७, लोहा १०, नायगाव १२, देगलूर ९ आणि मुखेड मतदारसंघात सर्वात कमी ५ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात लोहा, उमरी, भोकर या मतदारसंघात काही केंद्रावर रात्री नऊनंतरही मतदान सुरु होते. जिल्ह्यात अंदाजे ६५ टक्के मतदान झाले आहे. अंतिम आकडेवारी मात्र रात्री बारा पर्यंतही प्राप्त झाली नसल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मतदान प्रक्रियेनंतर आता २४ आॅक्टोबरला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

दरम्यान, जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारीही २२ आॅक्टोबर रोजीही निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा २२ आॅक्टोबर रोजी कर्तव्याचा कालावधी समजावा, त्यांची गैरहजेरी समजण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काढले.

पावसामुळे मतदान केंद्रावर चिखलविधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी पहाटेपासूनच सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे ११ वाजेपर्यंत मतदार घराबाहेर पडलेच नाहीत़ त्यानंतर मात्र मतदारांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या़ परंतु अनेक मतदान केंद्रावर चिखलातूनच मार्ग काढत मतदारांना आपला हक्क बजावावा लागला़

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिणbhokar-acभोकरloha-acलोहाdeglur-acदेगलूरmukhed-acमुखेडhadgaon-acहदगांव