शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरला; आवक वाढल्याने विसर्गास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 16:24 IST

प्रकल्पाला दोन कालवे आहेत.या प्रकल्पामुळे २३ हजार ३१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

ठळक मुद्देमानार नदीत १ हजार ७४७ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात येत आहे

कंधार ( नांदेड ) :  निम्न मानार प्रकल्प, बारूळ ता.कंधार ऑगस्ट अखेरीस १०० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाणी येवा ५ .१५७  द.ल.घ.मी. सुरु आहे. त्यामुळे १७७ स्वंयचलीत दरवाजातून १ हजार ७४७ क्युसेस पाणी मानार नदीत विसर्ग केला जात आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निम्न मानार प्रकल्प गतवर्षी सप्टेंबर महिन्यात भरला होता.त्याला अप्पर मानार प्रकल्प लिंबोटीमुळे आधार मिळाला होता. यंदा मात्र कंधार तालुक्यात जूलै महिन्यात अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने बारूळ प्रकल्पात जलसाठा वाढला.बारूळ प्रकल्प १४६.९२१ द.ल.घ.मी. पाणी साठयाचा आहे. एकूण उपयुक्त साठा १३८.२११ द.ल.घ.मी.आहे. सोमवारी ( दि.३० ) तालुक्यात दुपारी व रात्री पावसाने दमदार हजेरी लावली.तसेच माळाकोळी ता.लोहा मंडळात १९७ मि.मी.पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हे पाणी निम्न मानार प्रकल्पात जमा होत आहे. ५.१५७ द.ल.घ.मी.येवा चालू असल्याने प्रकल्प तुडुंब भरला. त्यामुळे स्वंयचलीत दरवाज्यातून १ हजार ७४७ क्युसेस पाणी मानार नदीत विसर्ग होत आहे.

हेही वाचा - Video : नामी शक्कल !  पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार 

प्रकल्पाला दोन कालवे आहेत.या प्रकल्पामुळे २३ हजार ३१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. कंधार तालुक्यातील ३८ गावातील ८ हजार हेक्टर, नायगाव व बिलोली तालुक्यातील ६१ गावातील १५ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांचा पाणी व पशुधनाचा चारा पाणी प्रश्न मिटला आहे. 

सावधानतेचा इशारानिम्न मानार शंभर टक्के भरला असून १ हजार ७४७ क्युसेस पाण्याचा मानार नदीत विसर्ग होत आहे. नदी काठावरील वसलेल्यानी नदी पात्रात उतरू नये. वाहने,जनावरे पात्रता सोडू नये.कोणतीही जीवीत व वित्त हानी होणार नाही. याची दक्षता घ्यावी.- एस.व्ही.शिराढोणकर (सहाय्यक अभियंता, बारूळ प्रकल्प श्रेणी -२)

हेही वाचा - मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन; ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस