शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सेल्फीच्या मोहात जीव गमावला; दोन सख्ख्या बहिणीसह एकीचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 14:51 IST

Lost his life in the temptation of selfies : शेताहून घरी परतत असताना जवळच असलेल्या तलावातील पाण्याचा सौंदर्य पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

ठळक मुद्देसायंकाळ होऊन गेली, तरीही मुली न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतलादुसऱ्या दिवशी तिघींचेही मृतदेह तलावात तरंगताना आढळले.

धर्माबाद ( नांदेड )  : धर्माबादपासून जवळच असलेल्या तेलंगणातील मौ. शिगणगाव म.तानूर येथील तलावावर सेल्फी काढताना तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. यात दोन सख्ख्या बहिणी होत्या, तर एक नातेवाइकातील मुलगी मुखेड, जि.नांदेड येथील होती. ( girl along with two sisters drowned in the lake) 

शिगणगाव हे धर्माबादपासून १० ते १२ कि.मी. अंतरावर असून, तानूर येथील स्मिता दादाराव येलमे (वय १५), वैशाली दादाराव येलमे (वय १३) व अंजली लोहबंदे (वय १४) या तिघी शेताकडे जातोत म्हणून घरून रविवारी सायंकाळी निघाल्या. काही वेळानंतर शेताहून घरी परतत असताना जवळच असलेल्या तलावातील पाण्याचा सौंदर्य पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. लगेच तलावाकडे जाऊन तलावावर सेल्फी काढताना पाय घसरला. त्याचठिकाणी मोठा खड्डा होता, तिघींनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडाल्या. 

सायंकाळ होऊन गेली, तरीही मुली न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला, मात्र कुठेच त्या आढळल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी ५ जुलै रोजी तिघींचेही मृतदेह तरंगताना आढळले. शेजारील शेतकऱ्यांना हे निदर्शनास आले. यानंतर ही घटना उघडकीस आली. 

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेड