शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोकमत इफेक्ट : नांदेडात आगारप्रमुख आणि पेट्रोल पंपचालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:48 IST

बस स्थानकात होते राजकीय नेत्यांचे बॅनर

नांदेड : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासांच्या आत राजकीय जाहिराती  करणारे सर्व बॅनर, फलक काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते़ परंतु, नांदेडातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रशासनाला त्याचा विसर पडला होता़ या ठिकाणी शासकीय योजनांच्या जाहिराती करणारे फलक झळकत होते़ या फलकांचे छायाचित्र ‘लोकमत’ने १३ मार्चच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागी झालेल्या प्रशासनाने सकाळीच घटनास्थळाचा पंचनामा करुन आगारप्रमुखावर गुन्हा नोंदविला आहे़ आचारसंहिता भंगाचा नांदेडातील हा पहिला गुन्हा ठरला आहे़

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यंत्रणांची बैठक घेवून आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासांच्या आत सर्व खाजगी मालमत्तेवरील पोस्टर्स, बॅनर्स, लेखन, झेंडे काढून घेण्याचे निर्देश दिले होते़ परंतु शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात शासकीय योजनांची जाहिरात करणारे व त्यावर नेत्यांची छायाचित्रे, भिंतीवर विविध संघटनांचे राजकीय पक्षाशी संबंधित असलेले बॅनर लावण्यात आले होते़ ‘लोकमत’ ने बसस्थानकात आचारसंहितेचा भंग होत असल्याची बाब छायाचित्राच्या माध्यमातून उघड केली.

त्यानंतर बुधवारी सकाळीच मनपाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश गच्चे हे पथकासह बसस्थानकात धडकले़ पथकाने या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर आणि संघटनांच्या फलकांचे चित्रीकरण केले़ या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यानंतर दुपारी नायगाव-नरसी रस्त्यावर पेट्रोलपंपावर मोदींचे असलेले छायाचित्र न काढल्यामुळे पेट्रोलपंप चालकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ नांदेडातील हा आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा ठरला़ 

काँग्रेसचे निवडणूक विभागाला पत्रलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली असून अजूनही राज्यभरातील एसटी बसेस, बसथांबे, पेट्रोलपंप तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या जाहिराती हटविण्यात आल्या नाहीत़ निवडणूक आयोगाने आदेश देवूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही़ याचा जाब निवडणूक आयोगाने सरकारला विचारून संबंधितावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे केली आहे़ 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड