शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

Lok Sabha Election 2019 : नांदेडमधील नाराज शिवसैनिकांचा हिंगोलीत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:44 IST

नाराज शिवसेना पदाधिकारी नांदेडात प्रचारात सक्रिय न होता हिंगोली मतदारसंघात फिरत आहेत़

ठळक मुद्देसंपर्कप्रमुखांची मध्यस्थी निष्फळ दिलजमाईच्या बाणाचा नेम चुकला

- शिवराज बिचेवार 

नांदेड : लोकसभा निवडणुकीत भाजपाने आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलेल्या उमेदवारीवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांची असलेली नाराजी दूर करण्यात अद्यापही सेनेच्या नेत्यांना यश आल नाही. दोन दिवसांपूर्वी नाराजांच्या दिलजमाईसाठी माजी आख़ेडकर यांच्या निवासस्थानी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी बैठकही घेतली़ परंतु, नाराज शिवसेना पदाधिकारी नांदेडात प्रचारात सक्रिय न होता हिंगोली मतदारसंघात फिरत आहेत़ त्यामुळे संपर्कप्रमुखांनी दिलजमाईसाठी चालविलेल्या बाणाचा नेम चुकल्याचे म्हटले जात आहे़

महापालिका निवडणुकीत सेनेचे आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपाच्या व्यासपीठावरुन सेना पदाधिकाऱ्यांच्या विरोधात शब्दबाण चालविले होते़ त्यावेळी चिखलीकरांनी सेनेच्या जिल्हाप्रमुखासह अनेकांना फोडत भाजपाच्या तंबूत आणले होते़   चिखलीकरांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांच्या मनावर खोलवर जखम झाली़ त्यात भाजपाने लोकसभेसाठी चिखलीकर यांच्या नावाची घोषणा करताच सेना पदाधिकाऱ्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली़ सेना पदाधिकाऱ्यांनी त्यापूर्वीच उमेदवार घोषित करताना भाजपाने आम्हाला विश्वासात घ्यावे, अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला होता

परंतु या इशाऱ्याकडे भाजपाने कानाडोळा केला़ त्यानंतर शहरप्रमुख पप्पू जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सेना पदाधिकारी चिखलीकरांचा प्रचार करणार नसल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला़ त्यानंतर दिलजमाईसाठी दोन दिवसांपूर्वी सेनेचे दिवंगत माजी आ़ प्रकाश खेडकर यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक झाली. यात सेना पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्यासमोर चिखलीकरांच्या प्रतापाचा पाढा वाचला़ परंतु संपर्कप्रमुखांनी मात्र मातोश्रीवरुन आदेश आल्यामुळे एकदिलाने कामाला लागावे लागेल असे आवाहन केले़  या बैठकीला चिखलीकरांचीही उपस्थिती होती़ परंतु, नाराजांनी यामध्ये मध्यममार्ग काढत हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे़

झालं गेलं गंगेला मिळालं -चिखलीकरमहापालिका निवडणुकीत जे झालं गेलं ते गंगेला मिळालं़ त्यावेळी दोन्ही पक्षांची युती नव्हती़ आता युती झाली आहे़ त्यामुळे शिवसैनिक एकदिलाने काम करुन महायुतीचा धर्म पाळतील, असा विश्वास मला आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019