शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:46 IST

एकाच कुटुंबातील तब्बल सहा उमेदवार मैदानात उतरवणाऱ्या भाजपचा धुव्वा उडाला

- गोविंद कदमलोहा : ‘घराणेशाही संपवू’ असा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षालाच लोहा नगरपरिषद निवडणुकीत घराणेशाहीचा फटका बसला आहे. एकाच कुटुंबातील तब्बल सहा उमेदवार मैदानात उतरवणाऱ्या भाजपचा धुव्वा उडाला असून, या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत नगराध्यक्ष पदासह तब्बल १७ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला एक आणि काँग्रेसला एक अशी प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे.

घराणेशाहीला दणका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी हे उमेदवार होते. तर नगरसेवकपदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी (प्रभाग ७ अ), भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग १ अ), भावजय सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग ८ अ), मेव्हणा युवराज वाघमारे (प्रभाग ७ ब) आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे (प्रभाग ३) या सर्वांना भाजपने उमेदवारी दिली होती.मात्र, मतदारांनी या सर्व उमेदवारांना स्पष्ट नाकारले असून सहाहींचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या घराणेशाहीविरोधी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिग्गजांच्या सभा तरी पराभवनिवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या जाहीर सभा आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कॉर्नर बैठका घेऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवामुळे लोहा नगरपरिषदेत भाजपचा प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट झाले असून, स्थानिक राजकारणात या निकालाने मोठी चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nepotism Backfires on BJP in Loha Nagar Parishad Election

Web Summary : In Loha, BJP's family politics failed as all six candidates from one family lost. NCP, led by MLA Chikhalikar, won the Nagar Parishad with 17 seats. Big rallies couldn't help BJP overcome voter rejection of nepotism.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५