शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाच्या दारूची नांदेडच्या सीमावर्ती भागात झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:54 IST

(ता़ बिलोली. जि़ नांदेड) बिलोलीहून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात मद्याचे दर हे महाराष्ट्रातील दरापेक्षा जवळपास ३५ टक्के कमी असल्याने मद्यपींनी तेलंगणाचा रस्ता धरला आहे़

कासराळी : (ता़ बिलोली. जि़ नांदेड) बिलोलीहून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात मद्याचे दर हे महाराष्ट्रातील दरापेक्षा जवळपास ३५ टक्के कमी असल्याने मद्यपींनी तेलंगणाचा रस्ता धरला आहे़बिलोली हा महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवर असलेला तालुका आहे. मांजरा नदी दोन्ही राज्यांना दुभंगते. सीमेचे तसे अंतरही फारसे नाही. बिलोलीहूुन अवघ्या १२ कि़मी़ अंतरावर तेलंगणा राज्यसीमा आहे. येथे बीअरबार किंवा मद्याच्या दुकानात बीअर १०० ते ११० रुपयास मिळते़ तीच बिअर बिलोली व परिसरातील बार व मद्याच्या दुकानात १८० ते २०० रुपयांना मिळते. तेलंगणातील सर्वच मद्यांच्या दरात बिलोलीच्या तुलनेत मोठे अंतर आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात तेलंगणाच्या दारूचीच झिंग दिसते आहे. तेलंगणात मद्यावर एक देश एक करप्रणालीच्या हेतूने १ जुलै २०१७ वस्तू व सेवा कर (जीएसटी)लागू झाल्यानंतरही मद्यावर तेवढेच कर आकारले जातात. अन्य कोणतेही कर तेलंगणात आकारले जात नाहीत. त्यामुळे मद्यपींच्या पैशाची जवळपास ३५ -४० टक्के रक्कमेची बचत होऊ लागली़ त्यामुळे सीमावर्ती भागातील मद्यपी मोठ्या संख्येने तिकडे जात आहेत.कर कमी म्हणून दर कमी महाराष्ट्रापेक्षा तेलंगणामध्ये मद्याचे दर ३५ टक्क्यांनी कमी आहेत. अत्यंत कमी दरात मद्याचे वेगवेगळे ब्रँड तेलंगणात मिळतात. तेथील राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे वर्षातून एकदा किंवा दोनदा संबंधित गावच्या दुकानाचे लिलाव केले जातात. प्रत्येक वेळी वेगळा गृहस्थ लिलावाद्वारे मद्य परवाना मिळवतो. तेलंगणा सरकारने मद्यावर कर लावलेले नाहीत. महाराष्ट्रात मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कायमस्वरूपी मद्यविक्रीची परवानगी दिली जाते. दर कमी असल्यानेच बिलोलीसह इतर सीमावर्ती भागात मद्यपींचे लोंढे तेलंगणात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणा