शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:41 IST

शहरातील जयभीमनगर भागात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा खंजीरने भोसकून खून करण्यात आला होता़

नांदेड : शहरातील जयभीमनगर भागात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा खंजीरने भोसकून खून करण्यात आला होता़ या प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला़९ मार्च २०१७ रोजी जयभीमनगर भागात रात्री दहा वाजेच्या सुमारास आतिष ऊर्फ अक्षय गौतम वाघमारे (रा़ आंबेडकर नगर), अनिकेत ऊर्फ चिकू संदीप कांबळे व निहाल ऊर्फ शेट्टी विनायक पाईकराव हे तिघेजण मारोती जोंधळे या तरुणाला बेदम मारहाण करीत होते़ त्याचवेळी बुद्धभूषण कांबळे व अजय चित्ते हे दोघे जण भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत होते़ यावेळी आरोपी निहाल पाईकराव याने आमचे भांडण सोडविण्यास तू का मध्ये पडला असे म्हणून खंजीरने अजय चित्ते याच्यावर वार केला़ अजयने हा वार चुकविला़ त्यानंतर अनिकेत कांबळे याने अजयला पकडून ठेवले तर अक्षय वाघमारे व निहाल पाईकराव या दोघांनी अजयवर खंजीरने वार केले़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी अजयचा मृत्यू झाला़ याप्रकरणी बुद्धभूषण कांबळे यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात न्या़ एस़एसख़रात यांनी ११ साक्षीदार तपासल्यानंतर अक्षय वाघमारे, अनिकेत कांबळे व निहाल पाईकराव या तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ यदूपत अर्धापूरकर यांनी बाजू मांडली़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप