नांदेड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला असून, कोणत्या गुन्हेगारावर कोणता प्रस्ताव योग्य आहे, तो प्रस्ताव कसा तयार करावा, वरिष्ठ न्यायालयाने याबाबत दिलेले मार्गदर्शन कसे अंमलात आणावे, याबाबत द्वारकादास भांगे यांनी मार्गदर्शन केले. एमपीडीए, एमसीओसीए आणि तडीपार या प्रस्तावांना तयार करतांना काय त्रुटी राहतात आणि त्या त्रुटी प्रस्तावाचा बोजवारा कसा उडवितात, याबाबत द्वारकादास भांगे यांनी सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनानंतर आता जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध लवकरच तडीपार, एमपीडीए, एमसीओसीए या कायद्यानुसार लवकरच नवीन प्रस्ताव तयार होतील आणि सर्वसामान्य माणसाला सराईत गुन्हेगारांकडून होणारा त्रास आटोक्यात आणला जाईल, असे पोलीस विभागाला वाटते. या कार्यशाळेत अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पिंपरखेडे, महिला पोलीस अंमलदार शेख शमा गौस यांनी परिश्रम घेतले.
सराईत गुन्हेगारांच्या कारवाईसाठी पोलिसांनाही धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST