शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतीफ गुरूजींना सीईओंचा दणका, पाच शिक्षकांचे निलंबन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 18:10 IST

Nanded ZP School News : जिल्ह्यातील तब्बल ३९० माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीचे आदेश आहेत.

ठळक मुद्देअध्यापनातून गुणवत्ता वाढविण्याच्या सूचना

नांदेड : तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांनाशाळेच्या दुसऱ्याच दिवशी वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांना दणका दिला आहे. भोकर येथील लेटलतीफ पाच गुरूजींना निलंबित केले. या कारवाईमुळे मात्र शाळांची घंटा वाजण्यापूर्वीच शिक्षक शाळांच्या मैदानात हजर राहतील, अशी अपेक्षा आहे. ( Nanded ZP's CEO suspends five teachers )

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून शाळांची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले होते. दरम्यान, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३९० माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीचे आदेश आहेत. त्यात प्रत्येक शिक्षकांची कोरोना तपासणी करणेही गरजेचे आहे. कोविडमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याची ही संधी असून प्रत्येक शिक्षकांनी स्वयंस्फुर्तपणे विद्यार्जनाचे काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. ठाकूर यांनी शुक्रवारी पाच ते सहा शाळांना भेट देवून तेथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाच शिक्षकांचे निलंबन भोकर तालुक्यात दौऱ्यावर असताना एका शाळेत पन्नास टक्केपेक्षाही कमी शिक्षक उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी तत्काळ पाच शिक्षकांचे निलंबन केले. या कारवाईमुळे लेटलतीफ शिक्षकांना चपराक बसणार आहे. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकNandedनांदेड