शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नांदेड येथे पाईप चोरी प्रकरणात ठेकेदारास अंतिम नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:38 IST

जुन्या नांदेडातील होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या पाईपची खरेदी संशयास्पद असल्याने हे काम करणार्‍या सोहेल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सोमवारी महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे.

नांदेड : जुन्या नांदेडातील होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या पाईपची खरेदी संशयास्पद असल्याने हे काम करणार्‍या सोहेल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सोमवारी महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत योग्य बाजू न मांडल्यास हे काम रद्द करुन ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या प्रभाग १४ होळी येथे दलित वस्ती निधीतून २० लाख ७४ हजार रुपयांचे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामावर वापरण्यात येणारे पाईप चोरीचे असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी ५ मार्च रोजी १४ पाईप जप्त करीत एका प्लंबरला ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणात पाईप चोरांचे आंतरराज्यीय रॅकेटच समोर आले आहे. तेलंगणातील तीन पाईप कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नांदेडमध्ये येवून विविध भागातील पाईपांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात तिन्ही कंपन्यांचे चोरुन आणलेले पाईप नांदेडात आढळले आहे. इतवारा पोलिसांनी हे पाईप जप्त केले आहेत.

महापालिकेनेही या प्रकरणात सावध भूमिका घेताना ८ मार्च रोजी सदर काम बंद करण्याचे ठेकेदारास पत्र दिले तर ९ मार्च रोजी या कामासाठीचे पाईप खरेदीचे देयक सादर करण्याचे आदेश दिले. तीन दिवसानंतरही सदर काम करणार्‍या सोहेल कन्स्ट्रक्शनने पाईप खरेदीचे देयक महापालिकेपुढे सादर केले नाहीत. परिणामी ही खरेदी संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात पोलिसांकडून मागील तीन दिवसांपासून जुन्या नांदेडातील विविध भागातून पाईप जप्ती सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणात १२ मार्च रोजी महापालिकेने मे. सोहेल कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड स्टील वर्क्स या कंत्राटदारास अंतिम नोटीस बजावली आहे. पाईप खरेदी देयकांची मागणी करुनही आतापर्यंत सादर केले नाही. यामुळे या प्रकरणात संशय वाढल्याचे स्पष्ट केले आहे. ही पाईप खरेदी संशयास्पद असल्याचे  प्रथमदर्शिनी दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणात इतवारा पोलिसांनी सोमवारी पाईप जप्ती झाली नसल्याचे सांगितले. त्याचवेळी या प्रकरणात  पाईप कंपनी निर्मल पोलिसांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. या प्रकरणातील धागेदोरे लवकरच पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाईप चोरीस ठेकेदाराची मूक संमती? महापालिकेने सोहेल कन्स्ट्रक्शनला बजावलेल्या नोटीसमध्ये पाईप चोरीच्या आरोपास मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे. सदर पाईपची खरेदी नियमानुसार झाली नसल्याचे गृहीत धरण्यास भरपूर वाव झाल्याने आपणास दिलेले काम रद्द करुन आजपर्यंत टाकलेले सर्व पाईप खोदून चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात का देवू नये?  या प्रकरणात महापालिकेच्या झालेल्या मानहानीस आपणास जबाबदार धरुन आपला ठेका रद्द का करु नये? तसेच आपणास काळ्या यादीत का टाकू नये? अशी नोटीस महापालिकेने बजावली आहे. १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNandedनांदेड