शेतात बांधलेले बैल केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:46+5:302021-05-18T04:18:46+5:30

हदगांव तालुक्यातील दिग्रस येथे रूद्रानी कंपनीच्या प्लांटवरील दोन हायवाचे सेन्सर लांबविण्यात आले. ही घटना १६ मे रोजी घडली. रूद्रानी ...

Lamps made of oxen tied in the field | शेतात बांधलेले बैल केले लंपास

शेतात बांधलेले बैल केले लंपास

Next

हदगांव तालुक्यातील दिग्रस येथे रूद्रानी कंपनीच्या प्लांटवरील दोन हायवाचे सेन्सर लांबविण्यात आले. ही घटना १६ मे रोजी घडली. रूद्रानी कंपनीत भाड्याने असलेल्या विश्वजीत अर्थ मिक्स कंपनीच्या चार हायवा टिपरपैकी दोन टिपरचे १ लाख २० हजार रुपयांचे सेन्सर काढून नेण्यात आले. या प्रकरणात राजेश आचार्य यांच्या तक्रारीवरुन तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चोरट्याने केली शेतकऱ्याला मारहाण

हदगांव तालुक्यातील मौजे करमोडी शिवारात हळद चोरून नेताना पकडलेल्या चोरट्यानेच शेतकऱ्याला मारहाण केली. ही घटना १५ मे रोजी घडली. उमेश वडगावकर यांच्या शेतातील हळदीचा कट्टा आणि आंब्याची थैली चोरटा नेत होता. यावेळी वडगावंकर यांनी चोरट्याला अडविले. त्यानंतर चोरट्याने वडगांवकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणात मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खंजर घेऊन फिरणारा अटकेत

मुखेड तालुक्यातील परतूर फाटा येथे खंजर घेवून फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले. १५ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीकडून २०० रुपयांचे खंजर जप्त करण्यात आले. या प्रकरणात सपोनि कमलाकर गड्डीमे यांच्या तक्रारीवरुन मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोहा रस्त्यावर अवैध दारूपकडली

लोहा ते माळाकोळी जाणाऱ्या रस्त्यावर माऊली ट्रेडर्ससमोर अनधिकृतपणे दारूची वाहतूक करताना पकडण्यात आले. ही घटना १६ मे रोजी घडली. पोलिसांनी आरोपींकडून अडीच हजार रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणात पोहेकॉ. शेख चाँद शेख अली यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Lamps made of oxen tied in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.