शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकुलवार गोळीबार प्रकरणातील सहा जणांना जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:04 IST

या प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़

ठळक मुद्देभंडारीसह पोलीस निरीक्षक दिघोरे यांचा समावेश 

नांदेड : काँग्रेस कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार प्रकरणात औरंगाबादच्या मोक्का न्यायालयाने अटकेतील सहा आरोपींना जामीन नाकारला आहे़ त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते वीरेंद्र भंडारीसह पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांचा समावेश आहे़ या प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़ या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांकडून अत्यंत बारकाईने तपास करून न्यायालयासमोर पुरावे सादर केले होते़

१७ आॅगस्ट २०१९ रोजी काँग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार हे विणकर कॉलनी येथील आपल्या कार्यालयात असताना सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता़ त्यामध्ये कोकुलवार हे गंभीर जखमी झाले होते़ या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यात सर्वप्रथम बजरंग उर्फ योद्धा भीमराव नरवाडे (रा़ अंबाळा,  ता़ हदगांव) याला अटक करण्यात आली होती़ 

सात जणांना केली होती अटकपोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक धनंजय पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता़ धनंजय पाटील यांनी या प्रकरणात राजू देवराव राऊत, गुरुचरणसिंघ ऊर्फ लक्की संपूरणसिंघ गील, नाजिसोद्दीन ऊर्फ गुड्डू सय्यद मुनिरोद्दीन, सुभाष मोहन पवार, वीरेंद्र भंडारी, वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे या सात जणांना अटक केली होती़ दिघोरे हे पूर्वी नांदेडला स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते़ आरोपींनी नांदेडातील अनेक बड्या मंडळींकडून खंडणी वसूल केली होती़ ही बाब पोलीस तपासात पुढे आली़ आरोपींवर त्यानंतर मोक्का लावण्यात आला होता़ यातील सहा आरोपींनी मोक्का न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता़ न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे़ अटक झाल्यापासून गेल्या आठ महिन्यांपासून हे आरोपी तुरुंगातच आहेत़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड