शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:44 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि शासनाने दिलेल्या १५ डिसेंबर या डेडलाईनपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात खड्ड्यांसाठी खर्च केलेला कोट्यवधींचा खर्च खड्ड्यातच गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ डेडलाईननंतरही जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे ‘जैसे थे’ च्या स्थितीत आहेत़ त्यामुळे खड्डे बुजविण्याचा केवळ फार्स असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत़

ठळक मुद्देखड्डे बुजविण्याची डेडलाईन संपली : ७० टक्के काम पूर्ण झाल्याचा विभागाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि शासनाने दिलेल्या १५ डिसेंबर या डेडलाईनपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात खड्ड्यांसाठी खर्च केलेला कोट्यवधींचा खर्च खड्ड्यातच गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ डेडलाईननंतरही जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे ‘जैसे थे’ च्या स्थितीत आहेत़ त्यामुळे खड्डे बुजविण्याचा केवळ फार्स असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत़नांदेड जिल्ह्यातील राज्य, प्रमुख राज्यमार्गावर १ हजार ४७७ किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडले होते़ त्यापैकी संपूर्ण खड्डे बुजविण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातून सांगण्यात येत आहे़ परंतु, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे़जिल्ह्यात २ हजार ६५७ किलोमीटर लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहे़ त्यापैकी १६२८़४५ किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडले असून आजपर्यंत केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले आहे़ परिणामी शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी झाल्याचे दिसते़ जिल्ह्यात देगलूर, नांदेड आणि भोकर असे तीन उपविभागांतर्गत काम करण्यात येते़ सा़ बां़ च्या आकडेवारीनुसार भोकर विभागातील रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे पडलेले आहेत़ देगलूर विभागातील ११४४ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्गांपैकी ५८१़९७ किमीवर खड्डे पडले आहेत़या विभागातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे़ जिल्हा परिषदेने देगलूर विभागात सर्वाधिक ८२१ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करून दिले आहेत़राज्यभरातील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्यानंतर सर्वत्र खड्डे बुजविण्याचा सपाटा सुरू झाला़ परंतु, उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात कामाच्या दर्जाबाबत तडजोड करण्यात आल्याचे दिसते़ खड्डे बुजविलेत की त्यात गिट्टी आणि चुरी टाकली? असा प्रश्न पडत आहे़ खड्डे बुजल्यानंतर अगोदरच्या रस्त्यापेक्षा बुजलेल्या खड्ड्यांची उंची अधिक झाल्याने स्पीड ब्रेकर तयार झाले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास आदळआपट करीतच होत असून नेमके खड्डे कुणाचे बुजले? असा प्रश्न उपस्थित होत आहे़जिल्हा परिषदेच्या रस्त्याची झाली होती चाळणी४जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील एकूण १६९४ किलोमीटरचे रस्ते सा़बां़विभागाकडे हस्तांतरित करून दिले आहेत़ जिल्हा परिषदेकडून आजपर्यंत रस्त्याच्या डागडुजीचे काम व्यवस्थित न केल्यामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत असल्याची ओरड सा़बां़ विभागाकडून केली जात आहे़ जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्गावर रस्ता झाल्यानंतर दहा -दहा वर्षांपर्यत गिट्टीचा खडादेखील येवून पडलेला नाही़ त्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते ? अशी अवस्था काही ठिकाणच्या रस्त्याची आहे़