शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कंधारचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:45 IST

किल्ल्याच्या बुरुजाला पडल्या भेगा

ठळक मुद्देऐतिहासिक वास्तू भुईसपाट होण्याचा धोका बाराशे वर्षांचा किल्ला समस्यांनी ग्रासला

- गंगाधर तोगरे 

कंधार (जि. नांदेड) : ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक  प्रसिद्ध ठेवा भुईसपाट होण्याचा धोका  निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कंधारला समृद्ध असा वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या शहराला राष्ट्रकुटकालीन राजानी देखणी किल्ला वास्तू, निर्माण केली. तसेच  अनेक राजे व किल्लेदारांनी  किल्ल्यात नवीन वास्तूची  भर टाकली. राष्ट्रकुट राजा   या नगराला नटवले. जवळ आले  तरच नजरेला दिसणारे कंधार एक जाज्वल्य इतिहास जागवते. वर्षाला लाखो पर्यटक याचा अनुभव घेतात. भुईकोट किल्ला सतत पर्यटक, विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. किल्ल्यातील नानाविध वास्तू पाहताना तो रममाण होतो.

यापूर्वी किल्ला बुरूज ढासळले होते. त्याची पुनर्बांधणी करून वारसा जतन करण्याचा प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला. यासाठी  निधी उपलब्ध  झाला व दुरूस्ती झाली. परंतु आजस्थितीत पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या दिशेला बाहेरील किल्ला-बुरूजाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे किल्ला ढासळण्याचा पुन्हा धोका वाढला आहे.कोट्यवधीचा निधी खर्च करून विकासकामे झाली. तरीही अनेक सुविधांची मोठी वाणवा आहे. पिण्याचे पाणी, विद्युत रोषणाई, बगीचा, गाईड, मनुष्यबळ,  कोरडा खंदक, पोलीस चौकी, खंदकात झाडा झुडपाचे वाढलेले प्रमाण, किल्ल्यावरील वृक्षाचे समूळ उच्चाटन आदी समस्यांने किल्ला  हा पर्यटक, इतिहासप्रेमी, नागरिक, संशोधक, विद्यार्थ्यांत सतत चर्चेत असतो.

आता बुरूजाला पडलेल्या उभ्या भेगा तात्काळ दुरूस्ती करत वास्तू ,जतन करण्याची गरज आहे. अन्यथा किल्ला भुईसपाट होण्याचा धोका  आहे.  किल्ल्यातील अनेक वास्तुना झळाळी आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. तसा बुरूज दुरूस्तीने द्यावा. अन्यथा या भेगा अधिक रूंदावत जातील. आणि किल्ला खिळखिळा होऊन भुईसपाट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FortगडNandedनांदेडArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणtourismपर्यटन