शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:04 IST

तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देखरीप नजर आणेवारी सरासरी ६० : शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या सुधारित व अंतिम आणेवारीकडे

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.कंधार तालुक्यातील शेतीची मदार निसर्गपावसावर आहे. खरीप लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. रबी व सिंचन क्षेत्र तसे नाममात्र आहे. निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी वैतागला आहे. गत काही वर्षांत शेतीला सातत्याने फटका बसत आहे. त्यामुळे शेतक-यांचे अर्थकारण कमालीचे नाजूक बनत चालले आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर झाला होता. यावर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी शेतीतून उत्पादन काढण्याची अपेक्षा बाळगून होता.परंतु कापसाला पडलेला बोंडअळीचा विळखा, सोयाबीनला करपा रोगाचे चक्र, बुरशीजन्य रोग आदीने कमालीचा पिकांना फटका बसला. सोयाबीन काढणी चालू असून त्याचा उतारा मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे चित्र आहे. आता नजर आणेवारी जाहीर केली आहे. ती शेतकºयांचे समाधान करू शकणारी नाही.नजर आणेवारी तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार ताडेवार, लिपिक वर्षा डहाळे यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी एस.एम.पटणे, बी.एल.वाघमारे, हेमंत सुजलेगावकर, एन.जी. गजलवार, एम.ई.मेथे, एस.एम.धोंडगे यांनी सर्वेक्षण करून परिश्रम घेतले. ५० पेक्षा अधिक आणेवारी आली आहे. त्यामुळे आता सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत. यातूनच खरीप पिकाचे वास्तव चित्र समोर येईल, अशी शेतक-यांची धारणा आहे.शेती व्यवसायात आता बी बियाणे, खते, फवारणी औषधीच्या वाढत्या किमती, सालगड्याचे वाढलेले भाव, शेतमजुराची वाणवा, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आदी समस्यांनी शेतकरी घायगुतीला आला आहे. त्यातच निसर्ग पावसाच्या लहरीपणाची भर पडत आहे. त्यामुळे लागवडखर्चही निघणे कठीण झाले आहे. आता नजर आणेवारी काढून महसूल प्रशासनाने उत्पादनाचा लेखाजोखा जाहीर केला आहे. परंतु, शेतकरी सुधारित व अंतिम आणेवारीकडे डोळे लावून आहे.पावसाचा लपंडाव कायम !कंधार तालुक्यातील सहा मंडळांतील नजरी पैसेवारी सरासरी ६० आहे. कंधार मंडळात १० हजार ८३९ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची नजरी पैसेवारी ६० घोषित झाली आहे. कुरूळा मंडळात १२ हजार ३८४ हेक्टर पेरणी व ६० पैसेवारी, फुलवळ १२ हजार २७२ हेक्टर पेरणी व ५८ पैसेवारी, बारूळ १० हजार ९५९ हेक्टर पेरणी व ६१, पेठवडज १० हजार ८०३ हेक्टर पेरणी व ६१ आणि उस्माननगर मंडळात ९ हजार ३५४ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची पैसेवारी ६० घोषित करण्यात आली आहे़ कुरूळा व फुलवळ मंडळात शेतकºयांनी सर्वात जास्त पेरणी केली. परंतु, पावसाचा लपंडाव होत राहिला़

टॅग्स :NandedनांदेडMONEYपैसा