शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कंधार शहराची विजेची समस्या लवकरच सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:05 IST

शहरी विद्युत वितरण प्रणाली सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाने इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किम (आय़पी़डी़एस़) कार्यान्वित केली आहे़ त्याअंतर्गत कंधार शहरात ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र आकाराला येत असून त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे शहरातील विजेची समस्या सुटणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहरी विद्युत वितरण प्रणाली सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाने इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किम (आय़पी़डी़एस़) कार्यान्वित केली आहे़ त्याअंतर्गत कंधार शहरात ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र आकाराला येत असून त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे शहरातील विजेची समस्या सुटणार आहे़तालुक्यात सुमारे २३ हजार ९६२ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहक आहेत़ कंधार शहर, कुरुळा, बारूळ, पेठवडज, कंधार ग्रामीण युनिट अंतर्गत ९० गावे आणि ५० पेक्षा अधिक वाडी-तांड्यांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो़ ग्रामीण भागात वीजपुरवठ्यासाठी फुलवळ, बाचोटी, बारूळ, पेठवडज, कुरुळा येथे सबस्टेशन आहेत़, परंतु बहुतांश वेळा तो शहर सबस्टेशन येथून करण्याचा प्रसंग येतो़ त्यामुळे शहर व ग्रामीण भागावर मोठा ताण पडत होता़ त्यात आता केंद्र सरकारच्या नवीन योजनेमुळे वीज वितरण प्रणाली सशक्त होणार आहे़३३/११ केव्ही नवीन उपकेंद्राची स्थापना केली जात आहे़ योजनेअंतर्गत विविध मुख्य कार्य मोठ्या प्रमाणात आहेत़ नवीन उपकेंद्र निर्मिती, पावर ट्रान्सफॉर्मरची स्थापना, ३३/११ के़व्ही़ किंवा एल़टी़ लाईनची स्थापना, भूमीगत केबलिंग, नवीन वितरण ट्रॉन्सफॉर्मरची स्थापना, फिडर आदी ग्राहकांच्या मागणीप्र्रमाणे सोय आदी कामांचा समावेश आहे़ शहरातील २४ हजार ८४३ लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे़योजनेअंतर्गत शहरात उपकेंद्र निर्मितीचे काम सुरू झाले आहे़ दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून १५ डिसेंबर २०१८ ही अंतिम मुदत आहे़ सदर काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीणचा भार कमी होवून शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे. या चालू असलेल्या कामावर नांदेड पायाभूत आराखडा विभागांतर्गत नियंत्रण असल्याचे उपकार्यकारी अभियंता विकास खाचणे यांनी सांगितले़योजनेला २०१६ साली मंजुरीनंतर २०१७ पासून काम सुरु झाले़ नवीन ट्रान्सफॉर्मर फिडर आदींची सोय होणार असल्याने शहराची विद्युत क्षमता वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे़ ग्राहकांना सुलभ सेवा पुरविता येईल.- एस़ए़ दासकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण़