शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जय जवान ! सेवा पूर्ण करुन आलेल्या जवानाची ग्रामस्थांकडून जंगी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 18:49 IST

सैनिकाचा कुटुंबियांसह केला गौरव

ठळक मुद्देकाटकळंबा ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम१६ वर्षे सीमेवर  राहून देशवासियांची सेवा केली.संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत काम  

बारुळ (जि. नांदेड) : १६ वर्षे सैन्यदलात सेवा बजावून परत आलेल्या गजानन हाम्पले या जवानाचे स्वागत ग्रामस्थांनी गावातून उघड्या जीपमधून जंगी मिरवणूक काढून केले. गावातील मुख्य रस्त्याने कुटुंबियांसह मिरवणूक काढल्यानंतर जंगी सत्कार सोहळा राबवून काटकळंबा ग्रामस्थांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. 

काटकळंबा येथील भूमिपूत्र गजानन व्यंकटराव हाम्पले हे सैन्यदलात कार्यरत होते. १६ वर्षे त्यांनी सीमेवर  राहून देशवासियांची सेवा केली. निवृत्तीनंतर गुरुवारी ते गावी पोहोचताच ग्रामस्थांनी गावातील मुख्य रस्त्याने हाम्पले कुटुंबियांची वाजतगाजत मिरवणूक काढली. गावातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर गजानन हाम्पले यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य प्रतीभाबाई चिखलीकर, संजय देशमुख, पोलीस निरीक्षक मुळे, सरपंच अनिता चावरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळू पानपट्टे यांच्यासह जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक साईनाथ गुच्चे, गोविंदराव कोळगिरे, दत्ता चवडे, राष्ट्रपाल चावरे आदींची उपस्थिती होती.

संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत काम  

हाम्पले यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्रशालेत झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण बारुळ येथील शिवाजी विद्यालयात पार पडले. उमाकांत हत्ते या शिक्षकाने योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच आपल्याला सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे हाम्पले यांनी सांगितले. आग्रा येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रथम नेमणूक आसाममधील तेजपूर येथे मिळाली. या बरोबरच  उल्लेखनीय कार्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने शांती सैनिक म्हणून दक्षिण अफ्रिका येथे एक वर्ष काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. आसामसह जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब आदी राज्यांत त्यांनी काम केले. ग्रामस्थांनी केलेल्या या प्रेमपूर्वक सत्काराला आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावनाही हाम्पले यांनी यावेळी व्यक्त केल्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNandedनांदेड