शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील जुन्या कामांना वाढीव रकमेची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:46 IST

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत १५ विषयांना मान्यता देताना विद्यमान सभापतीच्या कार्यकाळात न झालेल्या तब्बल १९ सभांच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देविविध विषयांचा आढावा स्थायी समितीने दिली पंधरा विषयांना मान्यता

नांदेड : महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत १५ विषयांना मान्यता देताना विद्यमान सभापतीच्या कार्यकाळात न झालेल्या तब्बल १९ सभांच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली आहे.स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिकेने २०१६ मध्ये केलेल्या देखभाल दुरुस्ती कामासाठी वाढीव रक्कम मंजूर केली. तब्बल ११ लाख २७ हजार ३५९ रुपये तीन वर्षानंतर वाढवून देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी श्हरात सार्वजनिक पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी १७ लाख रुपयांची देयके अदा करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. शांताराम सगणे जलतरणिकेत स्टाईल्स बसविण्याच्या वाढीव कामालाही एकमुखाने मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल २५ लाख ४८ हजार रुपये अतिरिक्त बोजा महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. हा बोजा स्थायी समितीने मंजुर केला आहे. शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळा सुशोभिकरणाच्या वाढीव रक्कमेस मंजुरी दिली आहे. ८ लाख ४४ हजार रुपये नव्याने अदा करण्यात येणार आहे. असाच प्रकार राजर्षी शाहू महाराज पुतळा कामातही घडला आहे. तब्बल १६ लाख ७५ हजार रुपये अतिरिक्त बाबींसह स्थायी समितीने मंजूर केले आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये हाऊसकिपिंगचे काम ओमसाई स्वयंरोजगार सुरक्षा रक्षक संस्थेस देण्यात आले आहे. दलित वस्ती निधीअंतर्गत प्रभाग १० मध्ये गोविंदनगर भागात रस्ता करण्यासाठी ३८ लाख ५५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. हे काम जैनब कन्स्ट्रक्शनला निविदेतील दरानुसार दिले आहे. शहरातील मुलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुदीअंतर्गत दोन कामे मंजूर केली आहेत.या बैठकीस शमीम अब्दुल्ला, मकसूद खान, भानुसिंह रावत, अ. लतीफ, अ. रशीद, श्रीनिवास जाधव, राजू यन्नम यांच्यासह उपायुक्त अजितपाल संधू, विलास भोसीकर, सुधीर इंगोले आदींची उपस्थिती होती.शहरात विनापरवानगी किती बांधकामे?स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत शहरात दरवर्षी १० टक्के पाणीपट्टी देयकात वाढ करण्यात येते. त्याबाबतची माहिती घेण्यात आली. स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही दहा टक्के वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा व मल:निसारणाची सद्यस्थिती काय आहे, याबाबतही माहिती देण्यात आली. शहरातील विनापरवानगी व मंजूर नकाशाविरुद्ध होत असलेल्या बांधकामावरही नजर ठेवली असून सर्व माहिती घेण्यात आली. शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी किती प्रस्ताव वैध आणि किती प्रस्तावांना बांधकामाचे कार्यारंभ आदेश दिले.

टॅग्स :NandedनांदेडMayorमहापौर