शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथील डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशक्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:42 IST

कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत ५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या २४ जागांना मान्यता देण्यात आली आहे़ त्यामुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अशाप्रकारच्या वाढीव जागा मिळविणारे राज्यातले हे दुसरे महाविद्यालय असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ चंद्रकांत मस्के यांनी दिली .

ठळक मुद्देएमबीबीएसच्या ५० : पदव्युत्तरच्या २४ जागांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत ५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या २४ जागांना मान्यता देण्यात आली आहे़ त्यामुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अशाप्रकारच्या वाढीव जागा मिळविणारे राज्यातले हे दुसरे महाविद्यालय असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ चंद्रकांत मस्के यांनी दिली .भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहून अनेक राज्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांना प्रवेश क्षमतेत वाढीव जागा देण्यात आल्या होत्या़ जी महाविद्यालये नियम व अटीत बसतील अशा वैद्यकीय महाविद्यालयांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यात आल्या आहे़यात राज्यातल्या दोन महाविद्यालयातील एमबीबीएस प्रवेशक्षमतेत व पदव्युत्तरवाढीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली़ त्यात नांदेड जिल्ह्यातील कै़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे़ महाविद्यालयाच्या प्रवेशक्षमतेत ५० जागांची वाढ करुन त्यास २०१३ मध्ये तत्त्वता मान्यता देण्यात आली होती . संस्थेने गेल्या काही वर्षांत अनुभवी प्राध्यापक, भव्य इमारत, विविध सुविधा पूर्ण करुन एमसीआयच्या तपासणीत पात्र ठरल्यानंतर यावर्षी एमबीबीएसच्या प्रवेशक्षमतेला ५० जागांना शासनाने मान्यता दिली आहे़ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेच्या २४ जागांनाही शासनाने मान्यता दिली आहे़या वाढीव जागांमुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पदवी शिक्षण घेण्यासाठी फायदा होणार असल्याचे मत अधिष्ठाता डॉ़चंद्रकांत मस्के यांनी व्यक्त केले़ तसेच भविष्यात ही प्रवेशक्षमता दीडशे जागापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असून जागा वाढीत राज्यातले दुसरे महाविद्यालय असल्याचे ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी