असा नेता होणे नाही - खासदार हेमंत पाटील
नांदेड : हिंगोली जिल्ह्याचे नाव अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पातळीवर नेऊन उंचवणारे तरुण तडफदार नेतृत्व राज्यसभेचे खासदार ॲड. राजीवजी सातव यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्हा आणि महाराष्ट्राचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या जाण्यामुळे देशातील, राज्यातील युवकांची आशा उंचावणारा नेता राज्याला गमवावा लागला ही खूपच दुःखद घटना आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवून जनतेची सेवा केली. त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले. जनसामान्यांच्या मनात त्यांनी निर्माण केलेले स्थान सदैव अढळ राहील, अशा शब्दात हेमंत पाटील यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.