शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थींनी लैंगिक अत्याचार प्रकरण : फरार आरोपींच्या अटकेसाठी बिलोलीकरांचे शाळेत जोडेमारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:13 IST

बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथिल घटना

ठळक मुद्दे २० जानेवारीला शाळाच भरली नाहीशाळेचे प्रवेशद्वार तोडुन शाळेच्या प्रांगणात आंदोलन

बिलोली : तालुक्यातील शंकरनगर नगर येथील श्री. साईबाबा माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांनी सातव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपी हे अद्याप फरार असल्याने त्यांच्या अटकेची मागणी करत नागरिकांनी शाळेच्या प्रांगणात सोमवारी सकाळी आंदोलन केले.

सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री.साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक रसुल सय्यद व दयानंद राजुळे यांनी सातवीतील मुलीस अश्लील व्हिडीओ दाखवून अत्याचार केले. तसेच या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देऊन ही बाब कोणास न सांगण्याचे शपथपत्र अल्पवयीन मुलीच्या आईकरून लिहून घेतले. या प्रकरणी आरोपी दोन शिक्षक रसुल सय्यद व दयानंद राजुळे तसेच घटना दडपण्याचा प्रयत्न करणारे प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक  प्रदिप पाटील, सुरेखाबाई बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र तीन दिवसांपासून आरोपी फरार आहेत. यामुळे आरोपींच्या अटकेची मागणी करत नागरिकांनी सोमवारी सकाळी शाळेच्या प्रांगणात आंदोलन केले. 

आरोपींच्या फोटोला चप्पलांचा हार घातला दरम्यान, ही शाळा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या संस्थेची असून आज शाळा उघडण्यात आली नव्हती. आरोपींच्या शोधात पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहे. मात्र आरोपींना अटक करण्यात अपयश येत असल्याने तालुकावासीयांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सोमवारी आंदोलकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला आरोपींची फोटो टांगून त्याला चप्पलच्या माळा घातल्या. तसेच महिलांनी फोटोवर चप्पल -बुटांनी फटके मारले. तसेच प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत शाळेच्या प्रांगणात आरोपींच्या अटकेची मागणी करत घोषणाबाजी केली.

टॅग्स :Rapeबलात्कारagitationआंदोलनArrestअटकNandedनांदेड