शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'14 किमीवर माझी शेती आहे, कोविड सेंटरसाठी विनामोबदला द्यायला तयार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 17:25 IST

नांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

ठळक मुद्देनांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

मुंबई - राज्यात कोविड 19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुका स्तरावर आणि प्रमुख गावांमध्येही कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनीही याकामी पुढाकार घेतला आहे. आता, एका शेतकऱ्याने आपली शेती कोविड सेंटरसाठी प्रशासनाला देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. 

नांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे. तसेच, आपल्या ट्वटिमध्ये काही स्थानिक मीडिया, पालकमंत्री अशोक चव्हाण आणि संबंधितांना त्यांनी टॅग केलं आहे. स्वप्नील हे नांदेश शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलंय. तसेच, 3 हजारांपेक्षा अधिक युजर्संनेही हे ट्विट लाईक केलं असून 300 पेक्षा जास्त रिट्वटि आहेत.  दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्यात दरदिवसाल 50 ते 60 हजार बाधित आढळून येत आहेत. त्यातच, ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

राज्यात कडक लॉकडाऊनची शक्यता

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा लॉकडाऊन बाबत मोठे विधान केले आहे. राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. कडक निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसून रुग्णसंख्या वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीर राज्य सरकार आज कडक लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे म्हटले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNandedनांदेडFarmerशेतकरी