शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी लोप पावतेय; कोरोनामुक्त वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेसह नागरिकांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 18:13 IST

कोरोनाची धास्ती अनेकांनी घेतली आहे़ या भीतीतूनच नात्यागोत्यासह समाजही संकटाच्या वेळी दूर जात असल्याचे दिसते़

ठळक मुद्देनातेवाईकांनी विनंती करूनही नगरपालिकेचेही  असहकार्यशेवटी कुटुंबियांनी मध्यरात्री उरकले अंत्यसंस्कार

धर्माबाद (जि़नांदेड) : कोरोनाच्या दहशतीमुळे समाज माणुसकीही विसरत असल्याचा कटू अनुभव धर्माबाद येथील एका कुटुंबियाला आला़ मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी सहकार्य केले नाही़ पालिकेकडे विनंती केल्यानंतर त्यांच्याकडूनही मदत न मिळाल्याने कुटुंबियातीलच काही जणांनी एकत्रित येऊन मध्यरात्री या वृद्धावर अंत्यसंस्कार केले़

माणसाचा मृत्यू अटळ आहे, कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू पावतोच.  मात्र सध्या कोरोनाची धास्ती अनेकांनी घेतली आहे़ या भीतीतूनच नात्यागोत्यासह समाजही संकटाच्या वेळी दूर जात असल्याचे दिसते़  धर्माबाद शहरातील इंदिरानगर येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी माधवराव माने यांचा ९ सप्टेंबर रोजी  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला़ नांदेड येथील दवाखान्यात जागा उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना रात्रभर ठेवण्यात आले़ त्यानंतर १० सप्टेंबर रोजी सकाळी निजामाबाद येथील शासकीय दवाखान्यात  जावई  सुरेश सोनकांबळे घेऊन गेले.  

उपचारानंतर १५ सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला. ठणठणीत झालेल्या वडिलांना मुलगा संजय याने आपल्या गावी घरी आणले. मात्र घरी आल्यानंतर त्याच दिवशी पाच तासांनी १५ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मात्र कोरोनामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा म्हणून अंत्यसंस्कारासाठी कोणीही फिरकले नाही़ एवढेच नव्हे तर नगरपालिकेकडे यासाठी सहकार्य मागितले असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने  एका माजी नगरसेवकाच्या मदतीने कुटुंबातीलच मुले, जावई  व घरातील इतर मंडळीच्या उपस्थितीत रात्री बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़

कुटुंबातल्या लोकांनी अंत्यसंस्कार केले़कोरोना पॉझिटिव्हमुळे मृत्यू झाला असा समज करून रात्रीच्या वेळी कुणीही मदत करण्यास तयार नाही़ अशावेळी माजी सभापती गंगाधर जारीकोटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. नगरपालिकेचा ट्रॅक्टर मागितला पण नगरपालीकेनेही सहकार्य केले नाही़ विशेष म्हणजे कोणताही ड्रायव्हर येण्यास भीत होता़ अखेर खाजगी टेम्पो तयार करून वैकुंठधाम येथील स्मशानभूमीत रात्री बारा वाजता कुटुंबातल्या लोकांनी अंत्यसंस्कार केले़- संजय माने (मयताचा मुलगा)

ड्रायव्हर व इतर कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली़अंत्यसंस्कारासाठी सहकार्य मागितल्यानंतर याबाबतची माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना दिली होती़ यावर निजामाबाद येथून उपचार करून आल्यानंतर सदर वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहेत याचीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ मात्र त्यानंतरही मी पालिका कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या, परंतु ड्रायव्हर व इतर कर्मचारी यांनी येण्यास टाळाटाळ केली़ त्यानंतर माने कुटुंबियांना सकाळी अंत्यसंस्कार करू या असा निरोप दिला होता़ मात्र त्यांनी रात्रीच अंत्यसंस्कार उरकले़- विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद़

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्या