शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात जपली माणुसकी; हॅप्पी क्लबने केले साडेचारशे जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:49 IST

corona warriors from Nanded अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने ही जबाबदारी घेतली.

- शिवराज बिचेवार

नांदेड : ज्यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे येत नव्हते, त्यावेळी नांदेडातील मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने पुढाकार घेऊन माणुसकी जपली. महापालिकेकडून फक्त पीपीई कीट घेऊन या तरुणांनी नि:स्वार्थपणे जवळपास साडेचारशेहून अधिक जणांवर अंत्यसंस्कार केले. त्याबद्दल प्रशासनाकडून हॅप्पी क्लबचा नुकताच गौरव करण्यात आला. यापुढेही ही सेवा सुरू ठेवण्याचा मानस या तरुणांनी व्यक्त केला.

नांदेडात आतापर्यंत कोराेनामुळे ६१० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्या एप्रिल महिन्यात गेला होता. पीरबुऱ्हाणनगर येथील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने ही जबाबदारी घेतली. त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्वच मृतदेहांवर या तरुणांनी अंत्यसंस्कार केले. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. एकाच दिवशी जवळपास सात ते आठ अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली. या कामात जवळपास ४० तरुण सहभागी झाले होते. अंत्यसंस्कार केल्यानंतर अंगावर सॅनिटायझरचा फवारा मारायचा अन् नंतर कार्यालयात गेल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची अन् त्यानंतरच घर गाठायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता. आपण केलेल्या कामाच्या समाधानामुळे रात्री झोपही चांगली यायची, अशी प्रतिक्रिया या तरुणांनी दिली.

परमेश्वराने आमची निवड केली याचा आनंदकोरोनाने मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे नव्हते. नातलग दूर थांबत होते. अशावेळी आम्हीच त्यांचे नातेवाईक होऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी परमेश्वराने आमची निवड केली, असे वाटते. पटापट मरणारी माणसे पाहून दु:खही व्हायचे; परंतु अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंदही होता. - मोहंमद शोएब मोहंमद खालेद

आपल्यामुळे घरी कोरोना होणार नाही याची चिंतादररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी परत जायची भीती वाटायची. आपल्यामुळे आपल्या चिमुकल्यांना किंवा इतर सदस्यांना कोरोना झाला तर कसे? याची चिंता असायची. घरी अनेक वेळा तसे बोलूनही दाखविले; परंतु कुटुंबातील सदस्यांनीही हे परमेश्वराचे काम आहे असे म्हणून धीर दिला. - शेख आफताब शेख युनूस

हे आहेत हॅप्पी क्लबचे मेंबरहॅप्पी क्लबमध्ये मोहंमद शोएब मोहंमद खालेद, शेख आफताब शेख युनूस, कुरेशी मो. दाईम गौस कुरेशी, मोहंमद कासीम खान मुनवर खान, मोहंमद मोईज बागवान अब्दुल हबीब, जुनेद खान सौदागर रशीद खान, मिर्झा सोहेल मिर्झा अताउल्ला बेग, अब्दुल सलाम मोहम्मद अफसर, सय्यद यासीन अली सय्यद युनूस अली, सय्यद बिलाल सय्यद बशीर आदींचा समावेश असून, या सर्वांचा प्रशासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूNandedनांदेड