शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मानवविकासच्या बसेसला हिमायतनगरचा विसर

By admin | Updated: June 23, 2014 00:03 IST

हिमायतनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मानवविकासच्या बसेस महत्त्वाच्या ठरतात़ मात्र शाळा सुरु होवून आठवडा लोटला तरी अद्याप ही बससेवा सुरु झालेली नाही़

हिमायतनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मानवविकासच्या बसेस महत्त्वाच्या ठरतात़ मात्र शाळा सुरु होवून आठवडा लोटला तरी अद्याप ही बससेवा सुरु झालेली नाही़दूर्गम भागाचा सर्वांगीन विकास व्हावा, येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मानव विकास मिशनअंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात़ जेथे माध्यमिक शाळा नाहीत अशा गावातील विद्यार्थ्यांना तालुक्यावरील शाळांपर्यंत ने आण करण्यासाठी मानव विकास अंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली़ मुलींसाठी ही सेवा मोफत तर मुलांसाठी माफक शुल्क आकारले जाते़ हिमायतनगर तालुक्यात मागील वर्षी पाच बसेस मानव विकास योजनेसाठी एसटी महामंडळास दिल्या होत्या़ तालुक्यातील पळसपूर, डोलारी, सिरपल्ली, बोरगडी, धानोरा, टाकळी, सिरंजनी, एकंबा, कोठा, कामारी जवळगाव, हिमायतनगर, सवना, जिरोणा, महादापूर, टेंभी, आंदेगाव, पवना, दरेसरसम, पोटा, सोनारी, करंजी, सरसम, मंगरुळ, खैरगाव, शिपदरा, कार्ला, वडगाव या गावांतील विद्यार्थी या बसेसचा लाभ घेतात़ पाच मार्गावर मानव विकासच्या बसेस गत वर्षी धावल्या़ अन्य काही गावे अद्यापही या सेवेपासून वंचित आहेत़ यंदा तर पूर्वीच्या मार्गावरही मानव विकासची बस अद्यापि धावलीच नाही़याबाबत हदगाव आगार प्रमुख मुपडे यांच्याशी संपर्क केला असता कामारी-जवळगाव व शिरपल्ली-कोठा या मार्गावर बस सुरु करण्यात आली़ अन्य मार्गावरही बसेस सुरु करण्यात येतील असे त्यांनी सांगीतले़ही बससेवा पूर्ववत सुरु करुन शाळेच्या वेळापत्रकानुसार बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी पालकांतून होत आहे़ (वार्ताहर)दीड हजार विद्यार्थ्यांचा राबता हिमायतनगर येथे चार हायस्कूल, दोन ज्युनिअर व एक सिनिअर कॉलेज आहेत़ तालुक्यातील दीड हजारावर विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी दररोज येथे येतात़ माध्यमिक शाळांचे विद्यार्थी मानव विकासच्या बसेसचा लाभ घेतात़ ग्रामीण भागातील पालक बहूतांश शेतकरी, मजूर आहेत़ त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रवासखर्च करणे शक्य नाही़