शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून रंगणार होट्टल महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:15 IST

चालुक्यकालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराची पुनर्बांधणी झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने प्रथमच होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवार (१७ व १८ फेब्रुवारी) असे दोन दिवस होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असून देगलूर व परिसरातील रसिक प्रेक्षकांना मेजवाणी ठरणार आहे.

ठळक मुद्देदोन दिवस कार्यक्रम : लावणी,कथ्थक, तबलावादनाची जुगलबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : चालुक्यकालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराची पुनर्बांधणी झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने प्रथमच होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवार (१७ व १८ फेब्रुवारी) असे दोन दिवस होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असून देगलूर व परिसरातील रसिक प्रेक्षकांना मेजवाणी ठरणार आहे.जिल्ह्यातील विधान परिषद व विधानसभेचे सदस्य आ. अमरनाथ राजूरकर, आ. सुभाष साबणे, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी उपलब्ध करून केलेल्या स्थानिक विकासनिधीतून येथील कार्यक्रम होत आहेत.या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी सायंकाळी होत असून यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री मदन येरावार, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शनिवारी सकाळी नऊ वाजता भार्गव देशमुख यांचे तबलावादन, प्रसाद साडेकर यांचे सुगम संगीत गायन तर दुपारी ‘चालुक्यकालीन स्थापत्यकला’ या विषयावर डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे, प्रा. एम.जी. महाके, प्रा. किरण देशमुख या इतिहास अभ्यासकांचा सहभाग असलेले चर्चासत्र आणि सायंकाळच्या सत्रात सिनेतारका आदिती भागवत व संच यांचा कथ्थक व लावणी जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.रविवारी दिवसभरात पंडित शौनक अभिषेकी यांची शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिल, विद्यार्थ्यांसाठी बालगीते, उद्धवबापू आपेगावकर यांचे पखवाजवादन, ऐनोद्दीन वारसी यांचे बासरीवादन तर रात्रीच्या सुमारास विजय जोशी, भरत जेठवाणी व ईशा जैन यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. होट्टल येथे पहिल्यांदाच होणाºया या महोत्सवासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन तयारीला लागले आहे़ होट्टल येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ, देगलूरमधील स्वयंसेवी संस्था यांचेही सहकार्य मिळत आहे़