शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘तलेदण्ड’ने मांडला महात्मा बसवेश्वरांच्या संघर्षाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:03 IST

सुप्रसिद्ध लेखक गिरीष कर्नाड लिखित ‘तलेदण्ड’ या नाटकाने महात्मा बसवेश्वरांच्या प्रारंभिक संघर्षाचा इतिहास रंगमंचावर उलगडविला.

ठळक मुद्देराज्य हौशी नाट्यस्पर्धानांदेडकर कलाकारांनी जिंकली मने

नांदेड : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची रंगत वाढत आहे. सुप्रसिद्ध लेखक गिरीष कर्नाड लिखित ‘तलेदण्ड’ या नाटकाने महात्मा बसवेश्वरांच्या प्रारंभिक संघर्षाचा इतिहास रंगमंचावर उलगडविला. बसवेश्वर यांनी प्रचलित जाती -व्यवस्था आणि वर्णव्यवस्थेवर केलेला प्रहार या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात कलाकारांना यश आले.राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या पाचव्या दिवशीही प्रेक्षकांनी कुसुम सभागृहात मोठी गर्दी केली होती. गिरीष कर्नाड लिखित तलेदण्ड हे नाटक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नांदेड शाखेच्या वतीने सादर करण्यात आले. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर आधारित हे नाटक नवोदित कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाद्वारे जिवंत केले. दिग्दर्शक गोविंद जोशी यांनी नवोदितांना घेवून सादर केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला. गिरीष कर्नाड यांनी १९८९ मध्ये हे नाटक लिहिलेले आहे. नाट्यलेखन सुरू असताना देशात विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार होते. त्यांच्याच सरकारच्या पुढाकाराने देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली आणि आरक्षण वाढले. त्यावेळी एका मोठ्या वर्गाला जसा दिलासा मिळाला तसाच या निर्णयाला देशभरात विरोधही झाला. कर्नाड यांनी या तात्कालीक घटनेतून प्रेरणा घेवून तशाच प्रकारचे आंदोलन आणि सामाजिक उभारणीचे प्रयत्न करणारे महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित ही नाट्यकृती लिहिली होती. बसवेश्वर यांचा बाराव्या शतकात कर्नाटक प्रांतात जन्म झाला. त्यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढविला.

आज ‘...मरिआय’राज्य नाट्यस्पर्धेत बुधवारी उस्मानाबादचा संघ नाटक सादर करणार होता. मात्र हे नाटक रद्द झाले. दरम्यान, गुरुवारी परळी येथील सर्वोदय शिक्षण कला अकादमीच्या वतीने विजय खानविलकर लिखित आणि अरुण सरवदे दिग्दर्शित ‘हणम्याची मरिआय’ या नाट्यप्रयोगाचे आज सादरीकरण होणार आहे.

हे कार्य करताना त्यांना संघर्ष करावा लागला. हाच संघर्ष या नाटकाच्या माध्यमातून कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केला. नाटकात गोविंद जोशी, स्नेहा पवार, सायली मेनन, शिवानी रायेवार, शिवा बिरकले, विनय पावडे, आनंद तेरकर, विवेक भोगले, मीनाक्षी पाटील, श्रीनिवास देशमुख, रवी सोनवणे, नरेंद्र रत्नपारखी, अरुण खणजोडे, अभिषेक रणवीरकर, प्रशांत गबाळे, सुगुणा कोलपेवाड, शाश्वत पुजारी, कृष्णा घुगे, शुभम रत्नपारखे, ज्योत्स्ना अंबेकर, बाबाराव ढोणे, ज्योती पाटील, अंबिका नातेवाड, वेदांत स्वामी, तनुश्री पांडे, राजेश्री जोशी, गणेश कोलपेवाड, अष्टविनायक देशमुख, शुभम गबाळे, ऋषिकेश देशमुख यांनी भूमिका साकारल्या. नाटकाचे नैपथ्य अभिनव जोशी, विवेक भोगले यांनी तर आकर्षक प्रकाशयोजना स्वप्निल बनसोडे, जितेंद्रसिंह ठाकूर, रंगभूषा पुरुषोत्तम हाळदेकर, अर्चना जिरवणकर आणि वेशभूषेची जबाबदारी वैशाली गुंजकर, अपर्णा नेरलकर यांनी पार पाडली.

टॅग्स :NandedनांदेडTheatreनाटक